साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी तपासणी नाका येथे सीमा अधिक कडक करण्यात आल्या आहेत. याठिकाणी सर्वच वाहनांची तपासणी करण्यात येत असून, लाॅकडाऊनमुळे या मार्गावरील वाहतूक राेडावली हाेती़.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात दि. ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमा अधिक कडक करण्यात आल्या आहेत. यावेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलीस फाैजदार संजय उकार्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, अन्य पोलीस कर्मचारी व होमगार्ड याठिकाणी लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची येथे तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
----------------------
रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील मुर्शी तपासणी नाक्यावर कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. (छाया : संताेष पाेटफाेडे)