शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

वाकवलीत शिक्षकाला मारहाण करून लुटले

By admin | Published: October 26, 2016 12:10 AM

कऱ्हाडच्या तिघा व्यापाऱ्यांना अटक

दापोली : गाडीला धक्का मारून पुढे गेल्याने शिक्षकाला मारहाण करून त्याची दुचाकी, मोबाईलसह एटीएम कार्ड घेऊन पलायन करणाऱ्या बाप-लेकासह तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. ही घटना दापोली तालुक्यातील वाकवली येथे घडली. मोहनलाल चांडक (वय ५८), सूरज मोहनलाल चांडक (२९), शरद प्रमेशवर पिसाळ (२९, कराड, सोमवार पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते किराणा मालाचे व्यापारी आहेत. त्यांची चारचाकी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सविस्तर वृत्त असे, सागर श्रीधर दोड हे पोफळणे शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. ते खेड तालुक्यातील भरणे येथील रहिवासी आहेत. ते सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाले. वाकवलीजवळ येथे एका चारचाकी गाडीतील तीन प्रवाशांनी त्यांना थांबवले. तू आमच्या गाडीला धक्का मारून पुढे आला आहेस, असा आरोप करून त्या गाडीतील प्रवाशांनी दोड यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, इतके पैसे कशासाठी असे दोड यांनी विचारल्यानंतर त्या तिघांनी दोड यांना अचानक मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे घाबरलेले दोड एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममध्ये पैसे काढण्याला मर्यादा असल्याने दोड त्या गाडीतील प्रवाशांना ५० हजार रुपये देऊ शकले नाहीत. त्यामुळे या तिघांनी दोड यांना शिवीगाळ करून एटीएम, मोबाईल व त्यांची मोटारसायकल घेऊन खेडच्या दिशेने पलायन केले. काही वेळातच दोड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. दुचाकी, एटीएम, मोबाईल घेऊन पळालेले लोक उन्हवरे मार्गे गेल्याची खबर दापोली पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली. एमएच-५०/ए-६७५४ ही गाडी घेऊन ते तिघे उन्हवरे मार्गे जात होते. दापोलीचे पोलिस निरीक्षक डॅनियल बेन, भालचंद्र धारवलकर यांनी पाठलाग करून ही गाडी पकडली. गाडीतील हे तिन्ही प्रवासी सातारा येथील व्यापारी असल्याची आणि त्यांची नावे मोहनलाल चांडक, सूरज मोहनलाल चांडक आणि शरद प्रमेशवर पिसाळ असल्याची माहिती पोलिस चौकशीत पुढे आली. या तिघांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढा प्रकार होईपर्यंत ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे असंख्य शिक्षकांनी पोलिस स्थानकात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)