शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

उपप्रादेशिक कार्यालयाच्या तिजोरीत २६ कोटी

By admin | Published: December 24, 2014 11:21 PM

वायुवेग पथकाची कामगिरी : नऊ महिन्यात तब्बल ३७५९ गुन्ह्यांची नोंद

रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत केवळ वाहनांची नोंदणी आणि वाहन मालक, चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक स्वरुपातील कारवाईच्या रुपाने २६.१० कोटी रुपये महसूल जमा ेकेला आहे. या कालावधीत तब्बल ३,७५९ गुन्हे नोंदविले आहेत.परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत रस्त्यावर जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करुन रस्ता सुरक्षाविषयक बाबी तपासण्यात येतात. पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत विविध तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक -चालकांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंदवून २४.६१ लाख रुपये दंड, मोटार वाहन कर १३९.८० लाख रुपये असे एकूण १६४ लाख ४१ हजार रुपये वसूल केले आहेत.यामध्ये वाहनांचा फिटनेस, परवाना, इन्शुरन्स, ओव्हरलोड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट, रिफ्लेक्टर व अन्य गुन्हे असे एकूण ३ हजार ७६९ एवढे गुन्हे नोंदविले आहेत. परिवहन कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या शिकाऊ परवान्यासाठी संगणकीय चाचणी घेण्यात येते. वाहतुकीच्या नियमांची, वाहतूक चिन्हांची व कायद्यातील तरतुदींचे ज्ञान असेल अशाच उमेदवारांना शिकाऊ परवाना दिला जातो.याचबरोबर परिवहन संवर्गातील वाहनांची काटेकोरपणे तपासणी करुन ज्यामध्ये वाहनाच्या ब्रेकची तपासणी करणे, हेडलाईटची तपासणी करणे व अन्य सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करुन ज्यामध्ये वाहनाच्या ब्रेकची तपासणी करणे, हेडलाईटची तपासणी करणे व अन्य सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करुनच वाहनांना योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येत आहे.ओव्हरलोड वाहतुकीविरुध्द ११२ दोषी वाहनांवर कारवाई करून एकूण १३.२२ लाख रुपये दंड वसूल केला आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२७ वाहनांवर कारवाई करुन ६.०१ लाख रुपये वसूल करण्यात आले. रस्ता सुरक्षितेबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यालयाकडून जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ओव्हरलोड तपासणी, अवैध प्रवासी वाहतूक तपासणी रिफ्लेक्टर, हेल्मेट, हेडलाईट तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मालवाहू व प्रवासी वाहनांना लाल परावर्तक पट्टी लावण्याची मोहीम व रस्ता सुरक्षा विषयक जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, असे रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांचा कर वेळेवर भरावा तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहने चालवावी. अवैध प्रवासी, ओव्हरलोड वाहतूक करु नये अन्यथा आपली वाहने पोलीस स्टेशनमध्ये अडकवून ठेवण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान झालेली वाहन नोंदणीवाहनेसंख्यादुचाकी९,१४७कार, जीप१,४१७टॅक्सी१३आॅटोरिक्षा१,४५१बसेस३९अ‍ॅम्ब्युलन्स११ट्रक- टँकर१७०मालवाहू८६३ट्रॅक्टर१८जेसीबी/क्रेन/लोडर१९एकूण१२,९६८