शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

भारतातील पहिल्या तरंगत्या सुक्या गोदीचे यशस्वी जलावतरण

By admin | Published: May 25, 2016 10:25 PM

समुद्रात फिरणाऱ्या जहाजांच्या पाण्याखालील तळाच्या दुरूस्ती व देखभालींसाठी सुक्या गोदीची गरज असते.

रत्नागिरी : भारतातील पहिली स्टीलची तरंगती सुकी गोदी (फ्लोटिंग ड्राय डॉक) कोकणात, तीही जयगड खाडीकिनारी काताळे येथे बांधण्यात ज्येष्ठ मरिनर दिलीप भाटकर आणि त्यांचे सहकारी यांना यश आले. त्यासाठी गेली चार वर्षे असंख्य समस्यांना सामोरे जात त्यांनी खडतर प्रयत्न केले आहेत. या ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’चे मंगळवारी जयगड खाडीमध्ये यशस्वी जलावतरण करण्यात आले.समुद्रात फिरणाऱ्या जहाजांच्या पाण्याखालील तळाच्या दुरूस्ती व देखभालींसाठी सुक्या गोदीची गरज असते. अशा दुरूस्ती कामासाठी मुंबई बंदरात केवळ एक ब्रिटिशकालीन सुकी गोदी उपलब्ध आहे. भारतात आजवर निवडक फ्लोटिंग ड्राय डॉक्स परदेशातून आणलेल्या आहेत. त्यामुळे ही निकड लक्षात घेऊन कॅप्टन दिलीप भाटकर यांनी काताळे शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीसाठी ‘मरीन सिंडिकेट प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून सुक्या गोदीच्या बांधणीचा ध्यास घेतला. यासाठी २०१२ सालापासून अथक प्रयत्न सुरू झाले. लांजा तालुक्यातील शिपोशीचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योजक दिलीप बार्इंग यांना सोबत घेऊन हा प्रकल्प काताळे येथे सुरू झाला. याला साथ लाभली स्थानिक तंत्रज्ञ व व्यावसायिक स्त्री - पुरूष मंडळींची! जयगड खाडीतील स्वत:च्या बंदर प्रकल्पावर ‘मरीन सिंडिकेट’ने हा प्रकल्प सुरू केला. विशेष कोणत्याही सुखसुविधा नसतानाही तब्बल चार वर्षे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले आणि अनंत समस्यांना न डगमगता सामोरे जात यश खेचून आणले. ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’साठी आवश्यक असलेल्या सर्व स्टील प्लेट्सची निवड एस्सार, जिंदल आदी फाँड्रीमध्येच करण्यात आली होती. रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील स्थानिक वेल्डर्स आणि फिटर्स बांधकामाच्या ठिकाणीच आय. आर. एस.ची गुणवत्ता परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी बांधकाम पूर्ण केले. हे काम पूर्ण झाल्यांनतर आय. आर. एस.च्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले आणि मगच जलावतरणाला परवानगी मिळाली. या सर्व परीक्षणावेळी कॅ. दिलीप भाटकर स्वत: उपस्थित होते. जलावतरणावेळी कॅ. दिलीप भाटकर, प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले तसेच बंदर निरीक्षक महानोर, बंदर विभागाचे अन्य कर्मचारी, काताळे शिपयार्ड, मरीन सिंडिकेटचा सारा परिवार, प्रशांत लिमये, गजानन पाटील, सुरेंद्र भाटकर, धरमसी चौहान, केसरीनाथ बोरकर, सुनीता बोरकर, भाटकर यांची पत्नी दीप्ती भाटकर आदी उपस्थित होते. या निर्मितीत मरीन सिंडिकेट परिवारातील दर्शन भाटकर, साजीद तांबू, इंद्रनील भाटकर, महेंद्र पाटील, शेखर शिंदे, सागर मयेकर, रामदास पंडित, संजय पालकर, संतोष बारस्कर, रोहित भोवड, ओंकार भाटकर, अनंत पवार, रवींद्र सागवेकर, संज्योक्ती पवार, गौरी सावंत, गीता विलणकर, ऋणा मायनाक, अशोक घाटे, प्रफुल्ल मगर यांचे परिश्रम सार्थकी लागले. (प्रतिनिधी)या ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’चे संपूर्ण बांधकाम इंडियन रजिस्ट्रार आॅफ शिपिंग या भारतीय जहाजाच्या उच्च ‘क्लासिफिकेयनच्या अ‍ॅथॉरिटी’ नियमावलीनुसार करण्यात आलेले आहे. डिझाईन व रचना गोवा येथील नेव्हल आर्किटेक्ट राजेश बेळगावकर यांच्या कंपनीने केले आहे. ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’ ८० मीटर लांब, २४ मीटर रूंद आणि ९.२ मीटर उंच अशा आकारमानाची तसेच १२५० टन वजनाची आहे. १८०० टन वजनाचे व ५ मीटर ड्राफ्ट असलेले जहाज तळाच्या दुरूस्तीसाठी या ड्राय डॉकवर उचलले जाणार आहे. हे अजस्त्र ड्राय डॉक पाण्यात उतरण्यासाठी उधाणाच्या भरतीची गरज असते. त्यामुळे पौर्णिमेनंतरच्या उधाणाच्या भरतीला म्हणजेच २४ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनीटांनी जयगड खाडीत या ड्राय डॉकचे जलावतरण करण्यात आले.अजुन या फ्लोटिंग डॉकची पाण्यात असताना विविध तपासण्या तसेच तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यात येणार आहे. सुमारे दोन महिन्यानंतर याच खाडीत १० मीटर खोल पाण्यात एका जागी स्थिर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याखाली बसविण्यात आल्यावर दुरूस्तीसाठी येणारे जहाज यावर येऊन स्थिर होईल व त्या जहाजाला घेऊन हे ड्राय डॉक पाण्याबाहेर उचलण्यात येईल.