चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहे, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी येथे खडेबोल सुनावले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पंतप्रधानांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान काँग्रेस पक्षाला नक्षलवाद्यांचा पक्ष, गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचाराची पक्ष अशा शब्दांत हिणवले. पण देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक योगदान राहिले, इंदिरा गांधी, राजीव गांधीनी या देशासाठी बिलिदान दिले. सोनिया गांधीच्या विरोधात आम्ही काही भूमिका घेतली होती. परंतु त्यांनी देखील या देशाबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांची पुढची पिढी देखील आज देशासाठी काम करत आहे. इंदिराजींनी तर संपूर्ण जगात भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानाना भेटणार आहे, अशा शब्दात समाचार घेतला. ..तेव्हा वेगळीच माहिती पुढे आलीयानंतर खासदार पवार हे राज्य सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावरून जोरदार बरसले. या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अहो सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि सरकार सांगतेय वाऱ्यामुळे पडला. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. नौदल माझ्या अखत्यारीत ही होते. मी माहिती घेतली तेव्हा वेगळीच माहिती पुढे आली. ज्या राजाने रयतेचे राज्य उभे केले, शेतकऱ्यांचा पिकाच्या देटाला देखील हात लावू नका असे आदेश दिले. त्या राजाच्या पुतळ्यात देखील पैसे खायची हिम्मत या सरकारने दाखवली आणि वर म्हणे वाऱ्याने पुतळा पडला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८० वर्षे उभा आहे, हेही पुतळ्यात पैसे खाणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारने लक्षात ठेवायला हवे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
PM मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका शरद पवारांना खटकली, दिल्लीत जाऊन भेटणार; म्हणाले, "अशी भाषा.."
By संदीप बांद्रे | Published: September 23, 2024 6:03 PM