चिपळूण : देशाच्या प्रगतीचे शिक्षण हे माध्यम आहे. विद्यार्थी हा समाज उन्नतीचा मूलभूत पाया आहे. याच जाणीवेतून घाणेखुंट ग्रामपंचायतीकडून सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्याकडे पावसाळी छत्र्यांची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्वरित कंपनीने २५० छत्र्या उपलब्ध करून दिल्या.
घाणेखुंट गावातील ३ जिल्हा परिषद शाळा व ५ अंगणवाड्यातील मुलांना या छत्र्या देण्यात आल्या. सुप्रिया कंपनीचे धनंजय लाड यांनी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कंपनी सदैव अग्रेसर असेल असे सांगितले. सरपंच अंकुश काते यांनी कंपनीचे आभार मानले.
या वेळी सुप्रिया कंपनीचे अधिकारी शैलेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य लोटे संकेत चाळके, सूरज मोगरे, राजू ठसाळे, संदेश ठसाळे, सूरज महाडिक, अजिंक्य रोकडे, अनिकेत काते, तुषार खताते, खरात गुरुजी, ग्रामस्थ, पालक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना छत्री उपलब्ध करून दिल्याने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सेविकांनी ग्रामपंचायत व कंपनीचे आभार मानले.