कोल्हापूर : कलर्स आणि लोकमत ‘सखी मंच’च्यावतीने आयोजित ‘सूर राइझिंग स्टार्स’ स्पर्धेत संजय कौलवकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रद्युम्न कुलकर्णी व निखिल असोले यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. अभिषेक चव्हाण व शर्वरी जोग यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी ही स्पर्धा झाली. यावेळी सुशील अग्रवाल व नूतनदेवी अग्रवाल, कविता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी नवोदित आणि हौशी गायकांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेआणि शंभराहून अधिक कलाकारांनी प्राथमिक फेरीत आॅडिशन दिली. त्यातून निवडण्यात आले उत्तम २० स्पर्धक. ज्यांनी आपल्या गायकीने अंतिम फेरीत आपली छाप सोडली. या सुरेल स्वरयात्रेत अंतिम फेरीत धडक मारलेल्या गायकांनी एकाहून एस सरस गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. त्यात ‘लग जा गले’, ‘कुछ ना कहो’, ‘चमके शिवबाची तलवार’, ‘सूर निरागस’, ‘याड लागलं’, ‘निले निले अंबर पर’ अशा अवीट गोडीच्या गाण्यांचा समावेश होता.डॉ. विनोद ठाकूर-देसाई व गौरी कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगांची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनेल म्हणजे कलर्स चॅनेल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगांत मालिकांद्वारे सादरीकरण करून ‘कलर्स’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लोकमत ‘सखी मंच’ची गेल्या १६ वर्षांपासून घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘लोकमत सखी मंच’ने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी ४ फेबु्रवारीपासून सुरू झालेली ‘राइझिंग स्टार’ ही मालिका कलर्स चॅनेलवर दर शनिवारी व रविवारी रात्री नऊला प्रक्षेपित होणार आहे. कलर्स चॅनेलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर ‘शो’सारखे परीक्षकांसमोर येऊन कलाकारांना सादरीकरण करायचे नसून, कलाकारांचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ बघून प्रेक्षकांनी त्यांना मतदान करायचे आहे. मतदान करणारा चेहरा स्क्रीनवर झळकणार आहे. या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी परीक्षक आहेत विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ. प्रेक्षकांच्या आणि सेलिब्रेटी परीक्षकांच्या निर्णयावर ‘रायझिंग स्टार’ ठरणार आहे. जनतेच्या आणि सेलिब्रेटी परीक्षकांच्या निर्णयावर ठरणारा ‘राइझिंग स्टार’ बघायला विसरू नका आणि या कार्यक्रमात भाग घ्यायला विसरू नका. अवीट गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध‘लग जा गले’, ‘कुछ ना कहो’, ‘चमके शिवबाची तलवार’,‘सूर निरागस’, ‘याड लागलं’, ‘निले निले अंबर पर’ अशा अवीट गोडीच्या गाण्यानी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी कलर्स आणि लोकमत ’सखी मंच’च्यावतीने आयोजित ‘सूर राइझिंग स्टार्स’ स्पर्धा पार पडली. यावेळी विजेत्यांसमवेत अंजली देशमुख, परीक्षक गौरी कुलकर्णी, डॉ. विनोद ठाकूर-देसाई उपस्थित होते. तर दुसऱ्या छायाचित्रात सखी सदस्या उपस्थित होत्या.
सूर, तालामध्ये रंगले ‘राइझिंग स्टार्स’
By admin | Published: February 07, 2017 12:29 AM