शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

माकडतापाने घेरले; शासन मात्र ‘सुशेगाद’

By admin | Published: March 11, 2017 8:38 PM

माकडताप या भयानक आजाराला गतवर्षी म्हणजे २0१६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले या भागात सुरुवात झाली. माकडतापाने लोक आजारी पडू लागले

देशाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षाही लहान असलेल्या गोवा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. त्यानिमित्ताने गोव्यातील जनतेतील अतिशय प्रचलित असलेला शब्द म्हणजे ‘सुशेगाद’. ‘काँटे की टक्कर’ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘सुशेगाद’ राहिलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेसने सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला. तेव्हा गोव्यातील प्रचलित सुशेगाद शब्दाची आठवण झाली. ‘सुशेगाद’ म्हणजे कुठलीही काळजी, चिंता मनात न बाळगता निपचित पडून राहणे. या शब्दाची व्याख्या येथे सांगण्याचे कारण म्हणजे गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदा आणि दोडामार्ग तालुक्यांतील विविध परिसराला सध्या माकडतापाने पूर्णपणे घेरले आहे आणि असे असताना येथील महाराष्ट्रातील प्रशासन मात्र, ‘सुशेगाद’ आहे. मागील आठवड्यात माकडतापाने सलग दोघांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाला या साथीची जाग आली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ज्यावेळी बांदा परिसराला भेट देऊन अधिकाऱ्यांची ओळख परेड घेतली. त्यावेळी आरोग्य यंत्रणा जरा कुठे हालल्याचे जाणवले. प्रत्यक्षात माकडतापाने महाराष्ट्रात गतवर्षी प्रवेश केला. दोडामार्ग तालुक्यातील केर या गावी माकडतापसदृश रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्याला आता वर्ष उलटून गेले. यावेळी या साथीत दोघांचा मृत्यूही झाला होता. मात्र, प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे जाणवले नाही. परिणामी, डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत बांदा आणि परिसरात चार आणि दोडामार्गात गतवर्षी केर आणि परिसरात दोघांना अशा एकूण सहा जणांना जीव गमवावा लागला.माकडताप या भयानक आजाराला गतवर्षी म्हणजे २0१६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले या भागात सुरुवात झाली. माकडतापाने लोक आजारी पडू लागले. हे निदान व्हायलाच यासाठी बराचसा कालावधी गेला. ज्याप्रमाणे २000 साली कर्नाटक येथून रानटी हत्तींनी याच जंगलातून दोडामार्गात प्रवेश केला होता. त्याच जंगलातून पुन्हा एकदा माकडतापाची लागण व्हायला सुरुवात झाली. केर, मोर्ले, तेरवण मेढे, कुडासे, तळकट, भेकुर्ली हा दोडामार्ग तालुक्यातील जंगलांनी व्याप्त भाग आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने सर्व प्रकारच्या प्राण्यांचा अधिवास आढळतो. त्यामुळे गतवर्षी या भागात माकडतापाने थैमान घातले होते. त्याप्रमाणे यावर्षीही अजूनही कुडासे, तळकटमधील जंगलव्याप्त भागात माकडतापाचे रुग्ण आढळत आहेत. केरमध्ये सर्वांत पहिल्यांदा महाराष्ट्रातील पहिला माकडतापाचा रुग्ण आढळला होता. माकडतापाने एकाचा मृत्यूदेखील पहिल्यांदा केरमध्येच झाला होता. त्यामुळे माकडतापाचे महाराष्ट्रातील उगमस्थान म्हणून केरकडे पाहिले जाते. गतवर्षी ज्यावेळी केर आणि परिसरात ही साथ होती. त्याचवेळी या साथीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. अतिशय वेगाने पसरणाऱ्या या माकडतापाच्या साथीचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास भविष्यात जिल्ह्याचा जो जो भाग जंगलव्याप्त आहे. त्या भागात माकडतापाचे अधिराज्य असणार आहे. माकडतापाला आवश्यक वातावरण हे जंगली भागात असल्याने मोठ्या प्रमाणावर माकडांना याची लागण होत आहे. शेकडो माकडे मरून पडत आहेत. गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अगदी काजूच्या हंगामातच पुन्हा एकदा माकडतापाने दोडामार्ग तालुक्यातील त्या भागासह सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डिंगणे या भागालाही घेरले आहे.कर्नाटकातील हत्तींनी सन २000 साली दोडामार्ग तालुक्यातील वनसंपदेवर हल्ला चढवित याठिकाणी आपले राज्य केले. प्रत्यक्षात पाहुणे म्हणून आलेले कर्नाटकातील रानटी हत्ती जसे येथे पहिल्यांदा स्थिरावले. त्यांना आवश्यक असलेले खाद्य, चारा येथे मिळत होता. तशीच काहीशी परिस्थिती आता माकडतापाबाबत होताना आपल्याला आढळत आहे. हत्तींनी दोडामार्ग पादाक्रांत करीत जिल्ह्याच्या विविध भागांतील जंगलांमध्ये पुढील १५ वर्षे राज्य केले. येथील शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणले. दहा ते बाराजणांना या हत्तींच्या उपद्रव्यात आपला जीव गमवावा लागला. येथील शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या रानटी हत्तींना प्रत्यक्षात रोखण्यासाठी कर्नाटकातील पथकाला आणावे लागले आणि त्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात असलेल्या तीन रानटी हत्तींना पकडण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा हत्ती कर्नाटक येथील वनविभागाच्या ताब्यात आहे.हत्तींचे उदाहरण येथे देण्याचे प्रमुख कारण हेच आहे की, ज्या प्रकारे कर्नाटकातून हत्ती येथे आले. अगदी त्याच पद्धतीने कर्नाटकातून माकडताप हा आजार येथे आला. हत्तींना पकडण्यात ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्षानुवर्षे घालविली. त्याचा फटका सिंधुदुर्गमधील जनतेला बसला. तसाच काहीसा प्रकार आता माकडतापाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील केरमध्ये माकडतापाने शिरकाव केला आणि त्यानंतर तालुक्यातील ज्या ज्या भागात मोठी जंगले आहेत. तेथील माकडांना याची लागण झाली. शेकडो माकडे मृत्युमुखी पडली आणि त्यातून हा आजार दोडामार्ग तालुक्यातील शेकडो रुग्णांनाही झाला. केर गावामध्ये प्रत्येक घरातील एकाला तरी माकडतापाची लागण झाली होती. याठिकाणी सुरुवातीला आरोग्य यंत्रणा अशीच झोपी गेल्यासारखी होती. त्याचा फटका येथील लोकांना बसला. यावेळीसुद्धा दोडामार्गमधील दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. माकडतापाला रोखण्यासाठीची आवश्यक यंत्रणा महाराष्ट्र शासनाकडे नाही. त्यासाठी केरळ किवा कर्नाटक राज्यांतून उपचारांसाठी वाट पाहावी लागत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. गतवर्षी दोडामार्ग तालुक्यातील केर गावी माकडतापाचा पहिला बळी गेला. तेव्हापासूनच शासनाने याबाबत आवश्यक काळजी का घेतली नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने विचारला जात आहे. जर तेव्हापासून काळजी घेतली गेली असती किंवा माकडताप रोखण्यासाठी आवश्यक युनिट निर्माण केले गेले असते, तर त्या युनिटचा फायदा आता बांदा आणि परिसरात वेगाने फैलावणारी साथ आटोक्यात आणण्यासाठी झाला असता. मात्र, एवढ्या सुपरफास्ट पद्धतीने कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी झाली तर ते महाराष्ट्र शासन कसले?माकडतापाचा विचार करता आरोग्य, पशुसंवर्धन आणि वन अशा तीन विभागांची संयुक्त जबाबदारी येते. मात्र, यातील प्रत्येक विभाग आपआपली जबाबदारी एकमेकांवर ढकलून हात वर करीत आहे. माकडताप हा जसा जंगलातील माकडांना सर्वांत पहिल्यांदा जडतो. तसाच तो जनावरांनाही होतो. म्हणजे गोठ्यातील जनावरांवर गोचिडीच्या माध्यमातून हा ताप डसतो आणि त्यानंतर तो गोठ्यातून घरात येतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गावागावांतील गोठ्यांमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबविणेही आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य विभागाचा विचार करता सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा कायमच सलाईनवर आहे. त्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना किंवा कर्मचाऱ्यांना दोष देऊन काहीही उपयोग होणार नाही. तर त्यातील तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणजे वनविभाग. वनविभागाचा कारभार हा कायमच ‘सुशेगाद’ असतो. कारण सिंधुदुर्गातील हत्तींच्या धुमाकुळाच्यावेळीही वनविभागाने अशीच काहीशी भूमिका घेतली होती. हत्ती हटाव मोहीम प्रत्यक्षात राबविण्यासाठी वनविभागाला १५ वर्षांचा कालावधी लागला. त्यात १0 ते १५ जणांचे बळीही गेले. आता माकडतापाबाबत आवश्यक उपाययोजना आखण्याची गरज आहे. प्रत्यक्षात तसे वनविभागाकडूनही होताना दिसत नाही.एकंदरीत बांदा आणि परिसरात असलेली माकडतापाची साथ रोखण्याचे मोठे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. त्याचबरोबर ही साथ रोखताना आगामी काळात माकडताप म्हणजे नेमके काय? हा आजार रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? सध्याच्या काजू हंगामात जंगलात जाताना काय करावे? अतिशय गरज असेल तरच जंगलात जावे, अशा अनेक गोष्टींबाबतची जनजागृती करणे आवश्यक आहे. जेणेकरून लोकांमध्ये जागृती झाली तरच ही साथ आटोक्यात आणणे सोपे जाणार आहे. अन्यथा, माकडताप रोखणे अवघड होणार आहे. जरी बांदा आणि परिसरातील साथ आटोक्यात आली तरी भविष्यात सिंधुदुर्गच्या इतर भागात ही साथ हात-पाय पसरणार आहे, एवढे मात्र निश्चित. कारण जिल्ह्यात असा बहुतांशी भाग आहे की त्या ठिकाणी मोठ-मोठी जंगले आहेत.आवश्यक काळजी घ्या... अन्यथा माकडताप जिल्ह्याभरात पोहोचेलबांदा शहर व परिसरात आतापर्यंत ४६ रुग्ण, तर दोडामार्ग तालुक्यात २७ रुग्ण सापडले आहेत. बांद्यात ४ रुग्ण मृत पावले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.आतापर्यंत १0८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मणिपाल येथे पाठविण्यात आले आहेत.बांद्यात डिसेंबर २0१६ मध्ये पहिला रुग्ण सापडला. मात्र, आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने व तातडीने लसीकरण न केल्याने माकडतापाची साथ वाढत गेली.आतापर्यंत बांदा परिसरात ४00 हून अधिक माकडे ही मृत झाली आहेत. त्यामध्ये बांदा शहर, डिंगणे, गाळेल, डेगवे येथे व गोवा राज्यातील पत्रादेवी, तोरसे, मोपा, उगवे येथे मृत माकडे सापडली आहेत.आरोग्य, वन व पशुसंवर्धन खात्याने दुर्लक्ष केल्यानेच साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.माकडताप नियंत्रणासाठी लोकांना देण्यात येणारी प्रतिबंधात्मक लस महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने केरळ राज्यातून लस मागविण्यात येते.लसीकरणाचे आठ डोस घेतले पाहिजेत. त्यातील दोन डोस देण्यात आले आहेत. पहिल्या डोसनंतर महिन्याच्या कालावधीत दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत सटमटवाडी येथे १३0 व डिंगणे-धनगरवाडी येथे ९0 जणांना लसीकरण केले.बांदा शहरातील सटमटवाडी येथे माकडतापाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांद्यात येऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.आठ दिवसांपूर्वी एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने यंत्रणा हलली. सद्य:स्थितीत वनखात्याचे ४0 कर्मचारी, पशुसंवर्धनचे २५ कर्मचारी व पाच डॉक्टरांचे विशेष पथक कार्यरत आहे.माकडतापाला केएफडी (केसनूर फॉरेस्ट डिसिस) हे नाव आहे. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील यासनूर गावात पहिल्यांदा माकडताप आढळला. हा आजार संसर्गजन्य नाही.माकडांच्या अंगावरील दूषित गोचिडी माणसाला चावल्यास त्याचा प्रसार होतो. जनावरांना गोचिडी चावल्यासदेखील त्याचा प्रसार होतो.लक्षणे-भरपूर ताप, तीव्र डोकेदुखी, नाक, कान, घसा, हिरड्यांतून क्वचितप्रसंगी रक्तस्त्राव, १२ दिवसांहून अधिक काळ ताप असणे, अतिसार, उलट्या, खोकला, मान, कंबरदुखी, विष्ठेतून रक्त पडणे, सांधेदुखी, अशक्तपणा, शारीरिक श्रम करण्यास असमर्थता, पांढऱ्या पेशी कमी होणे. या रोगाचा प्रसार नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत अधिक प्रमाणात होतो.काय काळजी घ्यावी- लसीकरण, प्रतिबंधात्मक कपडे घालणे, पिसवांचे निर्मूलन, डास नियंत्रण, अंगाला केएफडी आॅईल लावून जंगलात जाणे, पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरणे, कामाशिवाय जंगलात जाणे टाळणे.आवश्यक ती उपाययोजना करताना याबाबतची जनजागृती करून प्रशासनाने येथील ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. अन्यथा, माकडताप हळूहळू जिल्ह्यात पसरायला वेळ लागणार नाही.महेश सरनाईक