शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

सुर्वे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:22 AM

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात ...

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, रत्नागिरी पक्षप्रतोद सुदेश मयेकर उपस्थित होते.

विशेष भत्त्याची मागणी

रत्नागिरी : मालवाहतूक करणाऱ्या एस. टी. चालकांना येणाऱ्या समस्या विचारात घेऊन त्या तातडीने दूर कराव्यात, चालकांना मुक्कामासाठी लागणारा वेळ, नाश्ता, जेवणाची होणारी गैरसोय विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये विशेष भत्ता देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

दापोली : येथील अनुबंध संस्थेतर्फे खानबहाद्दूर मेमोरिअल हॉस्पिटलला गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. हे यंत्र कसे चालवावे, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यावेळी डॉ. अनिरुद्ध डोंगरे, वरुण वालावलकर, ओंकार कर्वे, डॉ. मुनीर सरगुरोह उपस्थित होते.

एटीएम सेवा कोलमडली

देवरुख : चक्रीवादळामुळे संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील यंत्रणा कोलमडली होती. हळुहळू जनजीवन पूर्वपदावर आले असून, वीज पुरवठाही सुरळीत सुरु झाला आहे. मात्र, बँकांची एटीएम सेवा मात्र अद्याप कोलमडलेलीच आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची गैरसोय होत आहे.

साहित्य वाटप

रत्नागिरी : तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीतर्फे गरजूंना साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी सरपंच शेखर आकटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जामसंडेकर उपस्थित होते.

कोरोना केंद्राला मदत

देवरुख : येथील जुने तहसील कार्यालय येथे कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातून रुग्णचाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ३०० लीटरची पाण्याची टाकी व रुग्णांना बसायला बाकडी, पंखे व विजेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

निकष बदलण्याची मागणी

देवरुख : आंबा बागायतदारांच्या शिष्टमंडळाने मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन नुकसानभरपाईचे शासकीय निकष बदलण्याची मागणी केली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी हा प्रश्न राजदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरचिटणीस मनोज चव्हाण, वैभव खेडेकर, सुनील साळवी उपस्थित होते.

इंजिनियर नियुक्तीची मागणी

रत्नागिरी : रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वॉर्डसाठी पाईपलाईनसह इतर सर्व उपकरणे, साधनसामुग्री ही निकृष्ट दर्जाची वापरली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती वाटप

मंडणगड : तालुक्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत शिष्यवृत्ती अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद आदर्श शाळा, वाल्मिकीनगर येथे एकूण १४ मुलींना याचा लाभ देण्यात आला. प्रत्येकी ३०० रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक अमरदीप यादव, प्रशिक्षक विश्वनाथ जाधव, सुवर्णा लोणकर, आदी उपस्थित होते.

नियमित बसफेरी

खेड : प्रवाशांच्या सेवेसाठी ठाणे, खेड मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. खोपट स्थानकातून सकाळी ८ वाजता खेडसाठी बस सुटत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बस नियमित चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केले आहे.