रत्नागिरी : ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये नारशिंगे कार्यक्षेत्रातील नारशिंगे गावात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये आणि छावा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्यावतीने ‘कोरोनामुक्त माझे गाव’ सर्वेक्षण करण्यात आले.
बोंड्ये ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच छावा प्रतिष्ठानचे सुनील अनंत धावडे, पोलीसपाटील प्रवीण कांबळे, शिक्षक आर. बी. दुधाळे, नारशिंगेच्या अंगणवाडी मदतनीस सुप्रिया कांबळे, आशा सेविका स्वाती इंदुलकर, आरोग्य सेविका रावणंग, डेटा ऑपरेटर समीर गोताड, तसेच छावा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य गणेश कांबळे, चंद्रकांत गोताड, प्रशांत कांबळे यांचा या मोहिमेत सहभाग होता.
या पथकाने घरोघरी जाऊन ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोरोनामुक्त माझे गाव सर्वेक्षण पूर्ण करत असताना गावातील सर्व ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. छावा प्रतिष्ठान या संस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत सर्वेक्षण पथकास सहकार्य केल्याने या संस्थेच्या सदस्यांचे आभार मानण्यात आले.
या बातमीला ६ रोजीच्या शोभना फोल्डरला १ क्रमांकाचा फोटो आहे.