शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:27 PM

forest department Rajapur Ratnagiri- राजापूर तालुक्यातील आंगले गावातील एका पडक्या विहिरीत रानगवा पडल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच गव्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

ठळक मुद्देविहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदानगव्याला बाहेर काढण्यासाठी एका बाजूने खोदकाम

राजापूर : तालुक्यातील आंगले गावातील एका पडक्या विहिरीत रानगवा पडल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच गव्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले.तालुक्यातील आंगले गावी मनुष्यवस्तीपासून दूर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही विहीर आहे. काही ग्रामस्थ त्या विहिरीजवळून जात असता विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रानगवा असल्याचे कळले. आंगलेचे ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर यांनी याबाबतची माहिती राजापूर वन विभागाला दिली.

त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वि. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, चिपळूण येथील फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वन अधिकारी रमेश कांबळे, रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, दीपक खाडे हे आंगले येथे दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर, आयुब मीर, बाळा लाड या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना मदत केली.ही विहीर सुमारे बारा ते पंधरा फूट खोल असून, आतमध्ये तीन फूट पाणी असल्याने गव्याला बाहेर काढणे अवघड होते. त्यानंतर खोदलेल्या विहिरीत दगड टाकून आत अडकून पडलेल्या गव्याला बाहेर येण्यासाठी योग्य असा मार्ग बनविण्यात आला. हे काम सुरू असतानाच रानगवा आक्रमक होऊन तेथे असलेल्या मंडळींच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर तयार केलेल्या त्या पर्यायी मार्गाद्वारे आत पडलेला रानगवा विहिरीतून वर आला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.एका बाजूने खोदकामगव्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. मात्र, जेसीबी येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्मचारी व तेथे आलेल्या ग्रामस्थांसह त्या विहिरीच्या एका बाजूने खोदण्यास सुुरूवात केली.

टॅग्स :forest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुर