लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, तर राणी संभाजी माळी यांचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. दोन्हीही रुग्णांवर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चिखली येथील राणी माळी यांना सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर मसूरला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्रास कमी न झाल्याने त्यांना ८ आॅगस्ट रोजी कºहाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.‘मसूर परिसरातील लोकांनी स्वाइन फ्लूने न घाबरता कापूर व वेलचीचे छोटे दाणे प्रत्येकी पाच ग्रॅम घेऊन ते एकत्रित बारीक कुटून मिश्रणाची पूड स्वच्छ व सुती कापडात जवळ ठेवावी.दर दीड तासाने तिचा वास घेतल्यास स्वाइन फ्लूचा जिवाणू मरतो,’ अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.१ रिसवड येथील महादेव इंगवले यांना १९ जुलै रोजी मसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २० जुलैला कºहाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती ठीक न झाल्याने २१ जुलै रोजी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२ आरोग्य खात्यातर्फे चिखली, रिसवड व विभागातील गावांत स्वाइन फ्लूसंदर्भात सर्व्हे सुरू केला असून, जनजागृती सुरू केली आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे.३ मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. लोखंडे यांच्यासह आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांची जनजागृतीची मोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनी ताप, सर्दी, खोकला व घसा दुखणे अशी फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी केले आहे.
‘स्वाइन फ्लू’ने दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:48 PM