थकीत वीजबिले दाेन टप्प्यात घ्यावीत, या मागणीसाठी गुहागर भाजपतर्फे महावितरणकडे निवेदन देण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : काेविडच्या काळात थकीत असलेली वाढीव वीजबिले दाेन टप्प्यात भरून घ्यावीत, अशी मागणी गुहागर भाजपतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन गुहागर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्यात आले आहे.
गुहागर महावितरण क्षेत्रांतर्गत काेराेनाच्या काळात थकीत अशी वाढीव बिले महावितरणकडून मोठ्या रकमेने ग्राहकांना प्राप्त झाली आहेत. सध्याचा काळ अत्यंत हलाकीचा असल्याने ही बिले ग्राहकांना भरणे शक्य होत नाही. त्यामुळे ती दाेन टप्प्यात भरून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी गुहागर नगरपंचायतीचे गटनेते उमेश भोसले, शहर अध्यक्ष प्रकाश राहाटे, भाजपा तालुका चिटणीस ज्योती परचुरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, राजा गोयथळे उपस्थित होते.