शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

महाराष्ट्राच्या भाताची सात राज्यांना गोडी; हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 6:33 AM

चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने ‘रत्नागिरी आठ’ जातीचे बियाणे तयार करून अन्य राज्यांत त्याची विक्री करीत आहेत. रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्राने २०१९ मध्ये ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. 

कोकणात लोकप्रियसबंध कोकण व विदर्भात या वाणाने लोकप्रियता मिळविली. या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सहा राज्यांमध्ये पसंती मिळत आहे.

१३५ ते १४० दिवसांत हे पीक तयार हाेते. कापणी वेळेवर केल्यास तांदूळ तुटीचे प्रमाण कमी येते. मध्यम उंची असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. करपा किंवा कडा करपा या रोगाला प्रतिकारक आहे. सरासरी उत्पन्न हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे होते. 

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या अकरा जाती व एक संकरित जात विकसित केली आहे. ‘रत्नागिरी १’ हे वाण जुने असून, देशाबराेबरच अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळविली आहे. आता ‘रत्नागिरी आठ’ या वाणाला परराज्यांतही पसंती मिळत आहे.- डाॅ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी