शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

रत्नागिरीत थैमान : तुरुंगातील दहाजणांना कोरोना, डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 4:33 PM

पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर कोरोनाबाधितडॉक्टरदेखील पॉझिटिव्ह, आणखी ४७ अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. आजवर मुंबईतून आलेले नागरिक कोरोनाबाधित सापडत होते. मात्र, आता स्थानिक नागरिकही आढळू लागले असून, गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालांमध्ये आणखी ४७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६६१च्या घरात पोहोचला आहे. जिल्हा रुग्णालयातून गुरूवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जेल रोड क्वॉटर्समध्ये १०, पोलीस अधीक्षक कार्यालयात १, परकार हॉस्पीटलमध्ये १, रत्नागिरी शहरातील ३, राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे १, दापोली तालुक्यातील हर्णै येथे १२, खेड तालुक्यातील खोपी येथे १, वेरळ येथे १, लोटे येथे २, आष्टी येथे २, घरडा कॉलनीत २, खेड शहरात २, चिपळूण तालुक्यातील खेर्डीत २, कापरेवाडीत १, चिपळूण शहरात २, संगमेश्वर तालुक्यात २ आणि मंडणगड तालुक्यात १ रुग्ण आढळला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक रुग्ण आढळल्यानंतर या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

अनेकांनी सुट्ट्या टाकून घरी जाणे पसंद केले. तर रत्नागिरीतील जिल्हा कारागृहात एकाचवेळी १० जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहातील दहा जणांमध्ये ८ कैदी तर दोन जेल पोलिसांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी