रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने तवेरा कार व खासगी आराम बस यांच्यात देवरूख - संगमेश्वर मार्गावरील करंबेळे - खाकेवाडी येथे अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान झाला असून, अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार खासगी आराम बस मुंबईतून देवरूखकडे येत होती. तर तवेरा कार देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने करंबेळे - खाकेवाडी बसथांब्याजवळ आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, तवेरा कारच्या दर्शनी बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तवेरा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अपघातग्रस्त झालेली तवेरा कार कर्नाटकातून आली होती. सध्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस कोसळत असून, पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने तवेरा गाडीवरील चालकाचा ताबा सुटून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
देवरुख-संगमेश्वर मार्गावर बस अन् तवेरा कारची जोरदार धडक; दर्शनी बाजू चक्काचूर, चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 11:32 AM
Accident Ratnagiri: मुसळधार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने तवेरा कार व खासगी आराम बस यांच्यात देवरूख - संगमेश्वर मार्गावरील करंबेळे - खाकेवाडी येथे अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान झाला असून, अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
ठळक मुद्देदेवरुख-संगमेश्वर मार्गावर बस व तवेरा गाडीचा भीषण अपघात तवेरा कारचा चालक गंभीर जखमी