साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव परिसरातील सर्व ग्रामस्थांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह एकूण १९ जणांची चाचणी करण्यात आली.
काेंडगाव परिसरात काेराेनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूप आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रमाण कमी झाले असले तरी काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे सर्व ग्रामस्थांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या बैठकीत नुकताच निर्णय घेण्यात आला.
कोंडगावमधील जनतेने चाचणी करून घेण्याचे आवाहन सरपंच बापू शेट्ये यांनी केले आहे. मात्र, हे आवाहन करतानाच त्यांनी स्वत:ही चाचणी करून घेऊन या तपासणी माेहिमेला सुरुवात करून दिली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोंडगाव कॅटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी चाचणी करणे आवश्यक असून, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कोंडगाव सरपंच बापू शेट्ये यांनी केली आहे.