शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जैतापूरसह अनेक मुद्द्यांकडे मुख्यमंत्र्यांची पाठ

By admin | Published: April 19, 2016 12:25 AM

राजन साळवी : मे महिन्यात उध्दव ठाकरे साधणार प्रकल्पग्रस्तांशी संवाद

रत्नागिरी : विधिमंडळ अधिवेशनात जैतापूर प्रकल्प रद्द करण्याची मागणी राज्याने केंद्राकडे करावी, यासह आपण उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्देसूद बोलणे टाळले. त्याबाबतचे निवेदन देऊनही त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे पाठ फिरवली, याचा खेद वाटतो, असे प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकारपरिषदेत केले.कोकणच्या किनाऱ्यावर सिंधुदुर्ग ते रायगड विभागात १८ औष्णिक विद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यातून ३३ हजार २१ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. राज्याला ही वीज पुरेशी असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची गरज नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशी मागणी आपण विधिमंडळात केली होती. मात्र, त्या विषयावर बोलणेही मुख्यमंत्र्यांनी टाळले, हे खेदजनक आहे. हा विषय आपण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडला असून, येत्या मे महिन्यात ते जैतापूरला येऊन प्रकल्पग्रस्तांची सभा घेऊन संवाद साधणार आहेत, असे साळवी म्हणाले. विधिमंडळात २९३ नियमानुसार कोकण व मुंबईच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा झाली. आपल्याला १२ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली. यावेळी आपण जिल्ह्याचे, कोकणचे अनेक मुद्दे मांडले व त्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. पर्ससीन नेट बंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, आॅनलाईन सातबारा मिळण्यात ग्रामीण भागात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत होईपर्यंत हस्तलिखित सातबारा देण्याची व्यवस्था सुरू ठेवावी. घर दुरुस्तीबाबतची परवानगी प्रांत, तहसीलदार स्तरावर नसावी. गावठाण भागाबाबत शिथिलता हवी. काजू व आंबा नुकसान भरपाई हमीपत्राद्वारे देण्यात आली असली तरी त्यापासून अनेक बागायतदार वंचित आहेत. त्यांच्या बागांचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, कोकण विद्यापीठ व्हावे, शामराव पेजे महामंडळाला निधी द्यावा, पर्यटनासाठी जाहीर केलेल्या आराखड्यानुसार कोणत्या कामासाठी किती खर्च केला जाणार आहे, याचा खुलासा करावा, यांसारख्या मागण्या आपण शासनाकडे केल्या आहेत. (प्रतिनिधी)कमी पटसंख्येच्या शाळा सुरूच राहणाररत्नागिरी हा डोंगरी जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील २७२३पैकी १२५५ शाळा २०पेक्षा कमी विद्यार्थीसंख्येच्या आहेत. मात्र, भौगोलिक स्थिती पाहता या शाळा बंद केल्या जाणार नाहीत, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आपल्याला सांगितले आहे, असे आमदार साळवी म्हणाले.