शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पाठ्यपुस्तकांची रद्दी कवडीमोलाने

By admin | Published: April 12, 2017 3:41 PM

कचऱ्यातून पोटाची खळगी भरतात, रद्दीचा व्यवसाय तेजीत, पाठ्यपुस्तके ५ ते ६ रुपये किलोने विक्री

आॅनलाईन लोकमतरहिम दलाल/ रत्नागिरी, दि. १२ विद्येचे आचरण करुन आयुष्य घडविणारी पाठ्यपुस्तके, वह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची रद्दी कवडीच्या भावात विकली जात आहेत. त्यासाठी घरोघरी रद्दीवाले फिरत असून त्यांचा धंदा सध्या तेजीत चालला आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी कचऱ्यातून पैशाची कमाई केली जाते. या पोटासाठी झोपडपट्टी राहणारी अनेक कुटुंबीय कचऱ्यावर आपले जीवन जगत आहेत. त्यासाठी अनेक महिला व पुरुष पहाटे उठून कचराकुंड्या तसेच रस्त्यावर पडलेली रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशवा, पुठे्ठे साठवून त्याची विक्री करतात. त्यावरच शेकडो कुटुंबीयांची गुजराण केली जात आहे. झोपडपट्टीशिवाय उच्चभू वस्तीत राहणारेही भंगारातून मोठी कमाई करीत आहेत. शहर परिसरातून कचरातून साठवून आणलेले प्लस्टिक पिशव्या, बाटल्या, पुठ्ठे विकत घेऊन ते मुंबई व अन्य बड्या शहरातील कारखान्यांमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे लाखोंची कमाई करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काबाडकष्ट करण्यास ही मंडळी मागे पहात नाहीत, हे विशेष आहे.मुलांच्या परिक्षा आटोपल्याने अनेक पालक त्यांची पुस्तके, वह्या घरात साठवून न ठेवता ती रद्दी म्हणून काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हजारो रुपये किंमतीची पाठ्यपुस्तके, वह्या किरकोळ किंमतीत किलोवर विकले जात आहेत. पाच ते सहा रुपये किलो भावाने ही रद्दी विकण्यात येत आहे. त्यासाठी झोपडपट्टीत राहणारे पुरुष, महिला शहरातील कॉलनी, वाड्यांमध्ये सायकलवरुन फिरुन रद्दी गोळा करीत आहेत. वर्षभर पावसाच्या पाण्यापासून जपून, तसेच अन्य कारणाने ती खराब होण्यापासून आपल्या जीवा पलिकडे वापरण्यात येणारी पाठ्यपुस्तके, वह्या अगदी रद्दीच्या भावात विकली जात आहेत. त्यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे रद्दी खरेदीचा व्यवसायाला सध्या तेजी आली आहे. दहावी, बारावीनंतर बहुतांश खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्या असल्याने काही शाळांना सुट्टीही पडली आहे. वर्षभर जपणूक केलेली पाठ्यपुस्तके रद्दीमध्ये काढून सायकलवरुन गल्लोगल्ली फिरती करणाऱ्या रद्दी खरेदी करणाऱ्यांना कवडीमोलाने विकली जात आहेत.