आपण भारतीय खरं तर खूप नशीबवान आहोत, आपल्यात पतंजली, च्यवन, सुश्रुत, चरक सारखे आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची साधना शिकविणारे महान लोक होऊन गेले. योग शास्त्राचे आद्य प्रवर्तक पतंजली द्वापर युगापासून आद्य शंकराचार्यांची भेट होईपर्यंत म्हणजे काही लाख वर्षे जिवंत राहिले. अशा लोकांचं आरोग्यविषयक तत्त्वज्ञान आपण कधी आचरणात आणणार आहोत, हीच वेळ आहे नाही का, तर मूळ मुद्दा असा की, हे कृत्रित ऑक्सिजनची गरजच पडणार नाही, असं कसं करता येईल.
तर उत्तर असं आहे की, तुमची लंग्ज (फुप्फुसं) बळकट बनवा, इतकी बळकट की कोरोना त्यांचं काहीच वाकड करू शकणार नाही. त्यासाठी काय करायचं मग, श्वसनाचे व्यायाम किंवा breathing exercises आणि थोड्या नाॅन ग्लॅमरस भाषेत ‘प्राणायाम’. बाबा रामदेवांचे पोट पाठीला लावणारे कठीण प्राणायाम करायची गरज नाही. कारण प्रत्येकाला ते जमत नाही. मी फक्त दोन प्रकारचे breathing exercises शेयर करतोय, तेवढे केले, तरी ऑक्सिजन लावायची वेळ नक्कीच येणार नाही.
१. आंतर कुंभक.
२. अभ्यंतर कुंभक.
कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. आंतर कुंभक म्हणजे श्वास आत रोखणे, तर अभ्यंतर कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून बाहेरच रोखणे. आंतर कुंभक करताना मांडी घालून बसावं आणि श्वास हळूहळू आत घ्यावा, जेवढा वेळ न गुदमरता रोखता येईल, तेवढा वेळ रोखावा आणि मग हळूहळू सोडावा. असा आंतर कुंभक सुरुवातीला दहा वेळा करत, मग हळूहळू वाढवत रोज एक २५-३० वेळा करावा. अभ्यंतर कुंभक करताना, आंतर कुंभकाप्रमाणेच मांडी घालून बसावे आणि हळूहळू श्वास बाहेर सोडून तो शक्य तितका वेळ सहजपणे जमेल तसा बाहेर रोखून धरावा आणि मग हळूहळू श्वास आत घ्यावा.
याचीही आंतर कुंभकाप्रमाणे २५-३० रीपिटिशन्स करावी. कुंभक हे आसनावर किंवा चटईवर बसूनच करावेत, असं योगशास्त्र सांगतं.
त्यामुळे आपण ते पाळलेले बरं, तर आपण हे सोपे breathing exercises रोज करू या आणि आरोग्य पूर्ण जीवन जगू या, खूप सोपंय. आपल्या श्वासात आपलं आरोग्य लपलंय!
धन्यवाद!
- दीपेशकुमार दिलीप पाखरे, आहारतज्ज्ञ, रत्नागिरी.