शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
2
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
3
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
4
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
5
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
6
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
7
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
8
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
9
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
10
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
11
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
12
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
13
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
14
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
15
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
16
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
17
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
18
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
19
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
20
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 7:52 AM

शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मंडणगड येथील एका गर्भवती महिलेला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरच न आल्याने महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर आले. 

खेड (जि. रत्नागिरी) - रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री घडली. या प्रकाराबाबत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, तब्बल २४ तासानंतर डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले.

शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मंडणगड येथील एका गर्भवती महिलेला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरच न आल्याने महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर आले. 

डॉक्टरांना माहिती दिल्यानंतरही डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले नसल्याने गरोदर महिला मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकाराबाबत खेडमधील मनसेच्या काही कार्यकत्यांना कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर डॉक्टर हजर झाले आणि त्यांनी शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सगरे यांच्याशी या प्रकाराबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

डॉक्टरांची अनेक पदे रिक्त- मुंबई-गोवा महामार्गावर कळवणी उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.- तेथील स्त्रीरोगतज्ज्ञा महिन्यातून चार दिवसही रुग्णालयात येत बाब समोर आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञा येत नसल्याने ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे हाल होत आहेत.- डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही रुग्णालयात प्रसू‌तीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :Womenमहिलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल