खेड (जि. रत्नागिरी) : जंगलात मृतदेह असल्याचे स्वप्न मला वारंवार पडतात, असे एका युवकाने पोलिस ठाण्यात येऊन सांगितल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता चक्क एका पुरुषाचा सापळा आणि कवटी, तसेच झाडाच्या फांदीवर लाेंबकळणारी दाेरी सापडली. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शाेध आता खेड पाेलिस घेत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव- सावंतवाडी येथील याेगेश पिंपळ आर्या (३०) हा मंगळवारी खेड पोलिस ठाण्यात आला. त्याने खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून, तो माझ्या स्वप्नात वारंवार येऊन आम्हाला मदत करा, असे सांगत आहे, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई- गाेवा महामार्गावरील वेरळ गावातील भाेस्ते घाटाच्या डाेंगरात एक किलाेमीटर अंतरावर जंगलमय भागाची पाहणी केल्यानंतर अनोळखी मृतदेहाचे अवशेष मिळाले.
पाच फुटांवर कवटीपाेलिसांना जंगलमय भागात सापडलेल्या मृतदेहापासून ५ फुटांवर एक कवटी सापडली आहे, तसेच मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत.