शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद

By मेहरून नाकाडे | Published: September 28, 2022 2:02 PM

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळाचा ...

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळाचा आनंदसुद्धा लुटता येत नाही. मात्र, रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींसाठी आरे वारे येथे झिपलाईनचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे दिव्यांगांच्या मनातील भीती गेली आणि त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून साऱ्यांचा उत्साह वाढला. यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन दिन साजरा केल्याचे समाधान सर्वांना मिळाले.आरे वारे येथील ओशनफ्लाय झिपलाइने या दिव्यांगांना मोफत झिपलाईनचा आनंद अनुभवायला दिला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) आणि ओशनफ्लाय झिपलाईन यांच्या सहयोगाने दिव्यांगांनी जागतिक पर्यटन दिन अनोख्या रितीने साजरा केला. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना खूप दिवसांपासून आपल्या दिव्यांग बाधवांनाही आरेवारेचा अथांग समुद्र न्याहाळत झिपलाइनची संधी द्यायची होती. अनेक दिवस त्यांच्या मनात हा विचार घोळत होता. मग त्यांनी पर्यटन दिनाचे औचित्य साधून ओशनफ्लाय झिपलाइनच्या गणेश चौघुले यांच्याशी संपर्क साधला. चौघुले यांनी आरएचपीच्या दिव्यांग सदस्यांना मोफत झिपलाइनची सैर घडवली.आरे वारेच्या एका टेकडीवर बांधलेल्या रोपवेने किनाऱ्यावर पोहचता येते. ओशनफ्लाय झिपलाईनचे गणेश चौगुले यांनी आपला अमुल्य वेळ दिव्यांगांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिला. त्यांचे सहकारी राजेश मोहिते, सुरज चव्हाण, सुरज मयेकर, विजय शिवलकर, विधी शिवलकर यांनी दिव्यांगांना रोपवेवर चढविणे, उतरविणेसाठी मदत केली. आरएचपी फाउंडेशनचे समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे यांच्या सहकार्याने समिधा कुळये (सोलगाव), कल्पना भागण (फुफेरे), आयेशा काझी (पावस), सचिन शिंदे (गणेशगुळे) यांनी झिपलाइनचा आनंद लुटला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन