शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यात सरकारही सहभागी होईल - उपमुख्यमंत्री फडणवीस 

By मनोज मुळ्ये | Published: October 21, 2023 6:52 PM

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले

नाणीज : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा व अनेक उपक्रमांचा फायदा सरकारलाही होतो आहे. त्यांचे समाजोपयोगी कार्य मोठे आहे. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात सहभागी होण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.नाणीज येथील सुंदरगडावर शनिवारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. याचवेळी त्यांच्या हस्ते महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी उपयुक्त असलेल्या आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आता संस्थानकडे या सेवेत एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत झाल्या आहेत.जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले. आपण जगायचे व दुसऱ्यालाही जगवायचे ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे. ते महाराष्ट्रातील धर्मांतराचे षडयंत्र नेस्तनाबूत करण्याचे काम सतत करत आहेत. त्यांच्या कार्याचा फायदा सरकारला होतो. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करू.उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, धर्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. अपघातावेळी अनेकदा शासनाच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते, एवढी तत्परता आहे.प्रारंभी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, आम्ही हिंदूंनी एकजुटीने राहिले पाहिजे. इस्राईल-हमास युद्धातून आपल्याला भरपूर शिकायला मिळाले आहे. जे यापासून बोध घेणार नाहीत ते संपणार आहेत. म्हणून मी म्हणत असतो की, ‘हिंदू खतरेमे है’ आपल्याकडे धर्माबद्दल स्वाभिमान कमी आहे. पण थांबलो तर वेळ निघून गेलेली असेल. यहुदी आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली तर काय होईल? म्हणून जातीपातीत वाटले न जाता हिंदूंनी एक व्हावे.या सोहळ्याचे आभार प. पू. कानिफनाथ महाराज यांनी मानले. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संतपीठावर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, संपादक उल्हास घोसाळकर, उर्मिला घोसाळकर, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राहुल पंडीत, बिपीन बंदरकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस