शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:08 PM

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा हाेती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६,६७० ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त भागात केवळ २४ टँकरने दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६१ गावांमधील १५८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत हाेती. मात्र, दुसऱ्याच आठवड्यामध्ये टंचाईची भीषणता वाढल्याने ही संख्या २२८ वाड्यांवर गेली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि २० खासगी टँकर धावत आहेत. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्यातालुका -गावे वाड्या - टँकरमंडणगड - १ - १ - १दापाेली - १२ - १६ - १खेड - १५ - ४२ - १चिपळूण - १६ - ३५ - १गुहागर - २ - ३ - १संगमेश्वर - १९ - ३२ - १रत्नागिरी - १३ - ८२ - १३लांजा - ४ - ६ - १राजापूर - ९ - ११ - ३

टंचाईग्रस्त गावेलांजा- पालू, हर्दखळे, कोचरी, कुरंग

चिपळूण- कोंडमळा, कादवड, कळकवणे, सावर्डे, नादखेरकी, करंबवणे, कुडूप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण, डेरवण खुर्द, पेढांबे, गुढे.खेड- देवसडे, दिवाणखवटी, फुरुस, कुळवंडी, तळे, तुळशी बुद्रूक खु, चिंचवली, घेरारसाळगड, खवटी, आस्तान, चाटव, कशेडी, सवणस, चिरणी खोपी कळंबणी बु.

दापोली- उटंबर, आतगाव, केळशी, ओणनवसे, तामसतीर्थ, उन्हवरे, आडे, पणदेरी, कुडावळे, पांगारी तर्फ हवेली, आंजर्ले, महामाईनगर.संगमेश्वर- पाचांबे, काटवली, ओझरखोल, कुटगिरी, विघ्रवली, कोंडओझरे, शेनवडे, बेलारे खुर्द, कोळंबे, वायंगणे, मासरंग, तळवडे तर्फ देवरुख, मुचरी, निवे खुर्द, निवळी, असुर्डे, मिरकोंड, साखळकोंड, पेढांबे.

मंडणगड- भोळवली.राजापूर- ओणी, ओझर, वडवली, वडदहसोळ, दोनिवडे, कोंड्ये, सौंदळ, तळगाव, देवाचे गोठणे, प्रिंदावण.

गुहागर- धोपावे, सडेजांभारी.रत्नागिरी- शिरगाव, भाट्ये, नाचणे, सडामिऱ्या, केळ्ये, सोमेश्वर, गोळव, उक्षी, कळझोंडी, खेडशी, वरवडे, जांभारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ