शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
4
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
5
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
6
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
7
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
8
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
9
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
10
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
11
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
12
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
13
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
14
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
15
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
16
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
17
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
18
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
19
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
20
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका

चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ

By मनोज मुळ्ये | Published: March 18, 2023 11:00 AM

रत्नागिरी : चेहरा विद्रुप करुन एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे शुक्रवारी रात्री ...

रत्नागिरी : चेहरा विद्रुप करुन एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या घडला. दिलीप रामाणे असे त्यांचे नाव असून, बौद्धवाडीच्या स्मशानाजवळील आंब्याच्या बागेत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे कोतवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी दिवसभर त्यांना गावातील ग्रामस्थांनी पाहिले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात असताना बागेत त्यांना एक व्यक्ती रक्तबंबळ अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले, परंतु त्यांचा चेहरा विद्रूप झालेला असल्याने घातपताचा संशय वाटला. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटलांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क  साधला.दिलीप रामाणे रोज सायंकाळी काम आटोपल्यानंतर मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून घरी परतत असत, परंतु शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. कुटुंबीय त्यांची घरी वाट बघत असतानाच ते  बौद्धवाडीच्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी कुटुंबियांना दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस