शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

रत्नागिरीत ढगाळ वातावरणातही विमान उतरणार, पालकमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 11:54 IST

अत्याधुनिक यंत्रणा असलेले महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरणार

रत्नागिरी : रत्नागिरीत पावसाचे प्रमाण अधिक आहे. आकाशात ढग अधिक असतील तर विमान उतरण्यात अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी विमानतळावर अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. ती यंत्रे रत्नागिरीत दाखल झाली आहेत. त्यासाठी १७ एकर अधिक जागेची गरज असून, ती आठ दहा दिवसांत हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.सामंत म्हणाले की, विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होईल. कोस्टगार्डच्या टॅक्सी ट्रॅकचे काम महिन्याभरात सुरू होईल. येथील कंपाउंड वॉलचे काम महिनाभरात संपेल. सद्य:स्थितीत रत्नागिरी विमानतळावर अत्यावश्यक वेळी रात्री विमान उतरवता येऊ शकते. पण, ही नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसवल्यानंतर नाइट लँडिंगही अधिक सोपे होईल, असेही सामंत यांनी सांगितले.

महावितरणला ९४८ काेटीमहावितरणसाठी जिल्ह्याला ९४८ कोटी १४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील आपत्कालीन कामांसाठी २९९ कोटी, किनारपट्टीवरील गावांमधील भुयारी वाहिन्यांसाठी ४५० कोटी, वीज वितरण हानी कमी करण्यासाठी जुन्या तारा बदलणे, डीपी बदलणे यासाठी ९८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व मीटर बदलण्याचे काम केले जाणार आहे. नवीन उपकेंद्रे तसेच रोहित्र तसेच वाहिन्या यासाठी ४१४ काेटी रुपये मंजूर झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAirportविमानतळUday Samantउदय सामंत