देवरूख : गाडीवर पाेलिस दिवा आणि पाटी लावून रुबाबात आलेल्या एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी चांगलाच इंगा दाखविला. या ताेतया पाेलिसाला रविवारी (९ जुलै) रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान संगमेश्वर बसस्थानकाजवळ ताब्यात घेतले. सुशांत चंद्रकांत शिंदे (३६, रा. मीरा भाईंदर) असे त्याचे नाव आहे.संगमेश्वरातील बसस्थानकाजवळ पाेलिस लिहिलेली आणि पाेलिस दिवा असलेली क्वालीस (एमएच ०४, बीक्यू ६७८९) ही गाडी उभी हाेती. या गाडीबाबत संगमेश्वर पाेलिसांना माहिती मिळताच पाेलिस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी चाैकशी केली असता सुशांत शिंदे पाेलिस नसतानाही बनावट नावाचा वापर करत असल्याचे लक्षात आले. गाडीवर पाेलिस दिवा लावलेला हाेता. तर चालकाच्या बाजूला पाेलिस अक्षर असलेली पाटी लावलेली आढळली. पाेलिस दिवा आणि पाेलिस नावाचा अनधिकृतपणे ताे फिरत असल्याचे लक्षात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.त्याच्या विराेधात सहायक पाेलिस फाैजदार आर. ए. शेलार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम १७०, १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला देवरुख येथील न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक गावित यांच्या मार्गदर्शनखाली व्ही. व्ही. कोष्टी अधिक तपास करीत आहेत
Ratnagiri: कारवर पोलिस दिवा अन् पाटी, एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी घेतलं ताब्यात
By अरुण आडिवरेकर | Published: July 10, 2023 3:50 PM