शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ratnagiri: चिपळूणकरांचे २० वर्षांचे स्वप्न ‘ग्रॅव्हीटी’मुळे सत्यात उतरणार, १६० कोटींची योजना

By संदीप बांद्रे | Updated: December 12, 2024 13:05 IST

मे २०२५ अखेर योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न

संदीप बांद्रेचिपळूण : चिपळूण शहरातील बहुचर्चित ग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील श्रमगाथा ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात हाेणार असून, मे २०२५ अखेर योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या याेजनेमुळे तब्बल २० वर्षांनंतर चिपळूणकरांचे पाणी याेजनेचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

चिपळूण शहरातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासठी उपाययोजना म्हणून २००४ मध्ये कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटी पाणी योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी सुरुवातीला माजी आमदार रमेश कदम यांनी प्रयत्न केले. तत्कालीन पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांनी कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्यास मान्यता दिली. तसा कायदेशीर करार चिपळूण नगरपरिषद व पाटबंधारे विभागात करण्यात आला.या योजनेसाठी सर्वेक्षण करून तसा अहवाल संबंधितांकडे पाठवण्यात आला. तसेच या योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सोपविण्यात आली. योजनेसाठी आवश्यक साठवण टाकी व त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यानंतर ही याेजना रखडली हाेती. आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर योजनेच्या १६० कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळाली.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधीच या योजनेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीनंतर नाशिक येथील ठेकेदार कंपनीने पुणे येथील जिओ स्पेशल्स कंसाल्टन्सीच्या मार्गदर्शनाखाली कामाची तयारी सुरू केली आहे. कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटपासून खेर्डी येथील नवीन साठवण टाकीपर्यंत पाइपलाइन टाकण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा सल्ला घेतला जात आहे. ही याेजना लवकर पूर्ण हाेण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले व प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.

अंदाजपत्रक वाढता वाढेग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी सुरुवातीला सुमारे १२५ कोटी ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले हाेते. त्यानंतर ही योजना सुमारे १३५ कोटींवर पोहोचली. मात्र, आता अंतिम निविदा १६० कोटींवर पोहाेचली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणWaterपाणी