शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं
3
जयंत पाटलांचं विधान अन् वसंत मोरेंच्या हाती तुतारी?; हडपसरच्या सभेनंतर चर्चांना उधाण
4
कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी
5
"केस नसताना कंगवा फिरणारे खूप..."; मुख्यमंत्रि‍पदावरून गडकरींचा मविआच्या नेत्यांना चिमटा
6
व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी
7
Sharad Pawar : "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप
8
भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर?
9
धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत
10
नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती
11
माफी मागितली नाही तर...; पाकिस्तानी गँगस्टरनं दिली मिथुन चक्रवर्तींना धमकी, नेमकं प्रकरण काय?
12
"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात
13
"त्याला काय करायचंय? विराट-रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा पॉन्टींगने..."; गौतम गंभीर संतापला!
14
Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक
16
धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
17
रोहित-विराटचं नाही टेन्शन; KL राहुलकडे टॅलेंट! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी काय म्हणाला गंभीर?
18
'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर...
19
गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी
20
Baba Siddique : ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन?

अयोध्येतील यज्ञाचे नेतृत्व लांजातील गुरुजींकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 6:54 PM

रत्नागिरी : अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना मंत्रघाेषांनी प्रारंभ झाला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी नवकुंडी यज्ञ करण्यात येत आहे. ...

रत्नागिरी : अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना मंत्रघाेषांनी प्रारंभ झाला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी नवकुंडी यज्ञ करण्यात येत आहे. हा नवकुंडी यज्ञ मूळचे लांजा तालुक्यातील काेलधे येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्त्वाखालील सुरू आहे. त्यांच्यासह ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ करण्यात आला.अयोध्येतील सर्व विधी कृष्णयजुर्वेदीय पद्धतीनुसार होणार आहेत. मात्र, चार वेदांपैकी पहिला ऋग्वेद हा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपैकी पूर्वेकडील मुखातून प्रकट झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे श्रौत आणि स्मृती या दोन्ही विधींमध्ये ऋग्वेद मंत्रांनीच देवतांचे प्रथम आवाहन केले जाते. दशरथ राजाने केलेल्या पुत्रकामष्टी यज्ञाचा प्रारंभही ऋग्वेदातील मंत्रांसह करण्यात आला होता. या मंत्रोच्चारांसाठी मोघे गुरुजींच्या नेतृत्त्वाखाली देशभरातील ११ ब्रह्मवृंदांना निमंत्रित करण्यात आले आहे.हेमंत मोघे मूळचे कोलधे येथील रहिवासी असून, त्यांचे पूर्वज गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड संस्थानात स्थायिक झाले. तेथेच वेदमूर्ती हेमंत मोघे यांचा १९५९ साली बडोदा येथे जन्म झाला. त्यानंतर शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर स्मार्त याज्ञिक असा दुहेरी अभ्यास करून मार्च १९७६मध्ये जुनी अकरावी (एसएससी) झाल्यानंतर त्यांनी स्मार्त याज्ञिक पूर्णत्त्वास नेण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी वेदमूर्ती भट गुरुजी (पावसनजीक मावळंगे), वेदमूर्ती पाध्ये गुरुजी (कोलधे), बडोदा येथील वेदमूर्ती पित्रे गुरुजी यांचे मार्गदर्शन घेतले.कृष्ण यजुर्वेदीय गणेशशास्त्री यांना अयोध्येत ऋग्वेद मंत्रोच्चारांसाठी प्रमुख म्हणून पाचारण करण्यात आले होते. ती जबाबदारी त्यांनी हेमंत मोघे गुरुजींकडे सोपविली. त्यानुसार ते अयोध्येला रवाना झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखालील देशभरातील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद मंत्रोच्चारांनी राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ झाला.

वाराणसीत ऋग्वेद संहितेचे अध्ययनलक्ष्मणशास्त्री द्रविड, शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांच्या मार्गदर्शनातून वाराणसीमध्ये १९२१ साली साकारलेल्या श्री वल्लभराम शालिग्राम सामवेद विद्यालयात हेमंत माेघे गुरुजी दाखल झाले. तेथे वेदमूर्ती पुणतांबेकर गुरुजी यांच्याकडे त्यांनी ऋग्वेद संहितेचे अध्ययन पूर्ण केले. त्यानंतर गेली वीस वर्षे ते ऋग्वेदाचे अध्यापक आहेत. ते सहा महिने बडोद्यात, तर सहा महिने वाराणसी येथे जाऊन अध्यापन करतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAyodhyaअयोध्या