रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील मोबाईलचे दुकान फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याचा कालावधीत घडली.
याबाबत अल्ताफ सलीम विंधानी (२५, रा. राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे नाचणे येथील शंखेश्वर प्लाझामध्ये ‘मोबाईल वर्ल्ड’ नावाचे दुकान आहे. ते अज्ञाताने फोडून रोख ४० हजार रुपये आणि १ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करत आहेत.