रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात कोरोना व्हायरसची नागरिकांना धडकी भरली आहे़ त्यामुळे शहर परिसरातील औषधांच्या दुकानांमधून आरोग्याच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे़ प्रत्यक्षात बाजारात कोणीही मास्क वापरताना दिसत नाही, ही विशेष बाब आहे़कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावरुन दररोज नवनवीन आकडेवारी प्रसिध्द होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून जनजागृतीचे काम केले जात आहे. कोरोना व्हायरसला घाबरू नका, पण प्रतिबंधात्मक दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे़रत्नागिरी तालुक्यात चिनी खलाशी असलेली दोन मालवाहू जहाजे येऊन गेली़ मात्र, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतल्याने रत्नागिरीकर सुरक्षित आहेत़ तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे़ त्यासाठी बहुतांश नागरिकांनी स्वत:च उपाययोजना करण्याचे ठरवून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. पहिल्यांदा मास्कचा वापर करता यावा म्हणून औषधांच्या दुकानातून मास्कची खरेदी करुन ठेवली आहे़शुक्रवारी शहर परिसरातील औषधांच्या दुकानांमध्ये मास्क खरेदीसाठी अनेक नागरिक फिरताना दिसत होते़ मात्र, विक्रेत्यांकडून प्रत्येक नागरिकाला नकार देत होते़ कारण मास्कचा साठाच संपल्याने विक्रेते कुठून देणार, असाही प्रश्न काही दुकानदार करत आहेत. शहरातील औषधांच्या दुकानांमध्ये १५ आणि ३० रुपये किमतीचे मास्क विकण्यात येत होते़ शहरातील औषधांच्या दुकानांमध्ये मास्कचा तुटवडा होता़ त्यामुळे अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. औषध दुकानदारांनी मास्क पुरवठादारांकडे मागणी केलेली आहे़अनेकांच्या तोंडावर मास्ककोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन स्वत:चा बचाव करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी तयारी करुन ठेवल्याचे निदर्शनास आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकात फेरफटका मारताच रेल्वेमधील अनेक प्रवाशांनी आपल्या तोंडावर मास्कचा वापर केल्याचे दिसून येत होते़
corona virus- व्हायरसची नागरिकांना धडकी, रत्नागिरीत मास्क शिल्लकच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:55 PM
रत्नागिरी शहर परिसरात कोरोना व्हायरसची नागरिकांना धडकी भरली आहे़ त्यामुळे शहर परिसरातील औषधांच्या दुकानांमधून आरोग्याच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे़ प्रत्यक्षात बाजारात कोणीही मास्क वापरताना दिसत नाही, ही विशेष बाब आहे़
ठळक मुद्देरत्नागिरीत मास्क शिल्लकच नाहीतव्हायरसची नागरिकांना धडकी