शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

By admin | Published: June 04, 2016 12:24 AM

महावितरणची माहिती : कोयनेतील पाणीसाठा १३ टीएमसी

रत्नागिरी : कोयना धरणातील पाणीसाठा केवळ १३ टीएमसी इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार असला तरी राज्यावर भारनियमनाचे संकट नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.कोयना धरणाच्या पाण्याची क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. जलविद्युत प्रकल्पातून १९२० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते; परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत पाणी केवळ १३ टीमसी इतकेच शिल्लक राहिले आहे. पैकी चार टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे, तर उर्वरित नऊ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती होऊ शकणार नाही. सद्य:स्थितीत केवळ ४० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती कोयना एक व दोन प्रकल्पांतून होत आहे.नाशिक येथे ४६१, कोराडी ७४७, खापरखेडा ९३५, पारस ३६५, चंद्रपूर १३२९, भुसावळ ९५८, उरण येथील गॅस प्रकल्पातून २३२, कोयना प्रकल्प एक व दोनमधून ४०, साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पातून ९०, खासगी प्रकल्पातून ४२४९, केंद्रीय प्रकल्पातून ६९६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथील प्रकल्प गेले दहा महिने बंद असल्याने वीजनिर्मिती होत नाही, तर गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, ती कोकण रेल्वेसाठी देण्यात येते. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यासाठी विजेची मागणी वाढत असली तरी नियोजनबद्ध पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागणार नाही. पावसाने गुरुवारी हजेरी लावली आहे. त्यामुळे दररोज पाऊस सुरू झाला तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंबहुना हवेत गारवा निर्माण झाला तर मागणीवरही परिणाम होईल. गेली दोन वर्षे भारनियमन करण्यात आलेले नाही. आकस्मिक भारनियमन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तेही करण्यात आलेले नाही. भविष्यातही करावे लागणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. (प्रतिनिधी)आकस्मिक परिस्थितीवेळीतातडीचे नियोजनवाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या १८ हजार ४७६ मेगावॅट इतकी विजेची गरज असून, संपूर्ण राज्यात १६ हजार ३७० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी २ हजार १०६ मेगावॅटचा फरक असला तरी अद्याप राज्यावर भारनियमनाचे संकट नाही. भविष्यात आणखी मागणी वाढली तरी संकट ओढवणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणने आकस्मिक परिस्थितीसाठी तातडीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे.