रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. तरीही नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांनी नागरिकांना केल्या आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून आराेग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले.
२८ नोव्हेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून २१२ जण आले आहेत. त्यापैकी ११४ नागरिकांचा शोध घेऊन पडताळणी केली आहे. पैकी ५१ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, चाचणी केल्याचे अहवालानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोणीही कोविड संक्रमित झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
परदेशातून आलेले नागरिक
तालुका | परदेशातून आलेले नागरिक |
मंडणगड | १० |
दापोली | ३१ |
खेड | ४२ |
गुहागर | ०३ |
चिपळूण | ४७ |
संगमेश्वर | १६ |
रत्नागिरी | ५६ |
लांजा | ०३ |
राजापूर | ०४ |
एकूण | २१२ |