शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:42 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देगुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडलीनिकाल लागून दहा दिवस लोटले तरी वितरण नाही

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेला बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला अद्याप प्रारंभ झाला नसल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१ आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी ३,५६०, विज्ञान शाखेसाठी २,४८०, वाणिज्य शाखेसाठी २,०८०, संयुक्तकरिता १८४० मिळून एकूण ९ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात विनाअनुदानित ५१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेसाठी २,९२०, विज्ञान शाखेमध्ये ४,०८०, वाणिज्य ५,२४०, संयुक्त १४०० मिळून एकूण १३ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे.

स्वयंअर्थ सहाय्यितची एकूण २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेमध्ये ८८०, विज्ञान ११२०, वाणिज्य १०४०, संयुक्त ७८०, मिळून एकूण ३,८२० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे तर आहेच शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅफलाईन सुरू करणे आवश्यक होते. जेणेकरून प्रवेश अर्ज, छाननी, निवड यादी आदी कामे सोपी झाली असती. निकालपत्र देण्याबाबत अधिकृत सूचना अद्यान न काढल्याने पालकवर्ग देखील प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी