शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

Ratnagiri: मिठगवाणेत पतपेढी फोडून दीड कोटींवर डल्ला, तारण ठेवलेले २०० तोळे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:13 PM

राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा फोडून चोरट्यांनी सुमारे २०० तोळे सोन्यावर डल्ला मारला. तारण म्हणून ...

राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा फोडून चोरट्यांनी सुमारे २०० तोळे सोन्यावर डल्ला मारला. तारण म्हणून ठेवलेले हे सोने सुमारे दीड कोटी रुपयांचे आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन तपासकामाबाबत सूचना केल्या आहेत. इतक्या मोठ्या चोरीची घटना गेल्या अनेक वर्षात प्रथमच घडली असून, त्यामुळे जिल्हा हादरला आहे.छोट्या छोट्या व्यवहारांसाठी ग्रामीण भागातील लोकांना पतपेढ्यांचा आधार होताे. मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढी ग्रामस्थांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सोनेतारण व्यवहार होतात. मंगळवारी सकाळी ही शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाला शाखेचा कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली. शाखा व्यवस्थापकांनी तत्काळ नाटे सागरी पोलिस स्थानकासी संपर्क साधून तात्काळ तक्रार दाखल केली.सागरी पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीही घटनास्थळाला भेट दिली. रत्नागिरी येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल होती.

या शाखेतील सोने ठेवलेली तिजोरी चोरट्यांनी फोडली असून, त्यातील जवळपास २०० तोळे चोरल्याची तक्रार देण्यात आली आहे. रोख रक्कम ठेवलेली दुसरी तिजोरी मात्र तोडण्यात आलेली नाही. सदरची शाखा ही श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असून, येथे फारशी वर्दळ नसते. याचाच गैरफायदा घेऊन पतपेढी फोडण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस