शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 4:26 PM

माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देभाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्तीमाजी जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि दीपक पटवर्धन यांचे मनोमिलन

रत्नागिरी : भाजपमध्ये कोणतेही गट- तट नाहीत. सारे एकदिलाने अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना निवडून देण्याकरिता एकजुटीने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासमवेत सर्वजण अ‍ॅड. पटवर्धन यांना विजयी करण्यासाठी नियोजन करत आहेत. माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रत्नागिरीत शनिवारी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचार यंत्रणेची बैठक दीर्घ काळ चालली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रा. नाना शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, अ‍ॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजू भाटलेकर, गटनेता समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, बाळ माने गेली ४० वर्षे भाजपशी जोडलेले आहेत. त्यांचे नेतृत्व केवळ रत्नागिरीपर्यंत मर्यादित नसून राज्यापर्यंत पोहचलेले आहे. त्यांची कोणतीही नाराजी नाही. भाजप एक कुटुंब आहे. कुटुंबात मतभेद असणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. पक्षात आलबेल नाही, असे पत्रकारांना का वाटते? बाळ माने व मी गेली ३५ वर्षे पक्षात काम करत आहोत. प्रत्येक वेळी पक्षाकडून वेगवेगळी जबाबदारी येत असते, प्रत्येक जण ती पार पाडत असतो, बाळ माने नाराज नाहीत, असे आमदार चव्हाण म्हणाले.चर्चेने गैरसमज दूर झाले : बाळ मानेमाजी जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, भाजप ही संघटना कुटुंबासारखी आहे. एकाच घरात भावाभावांमध्येही मतभेद असू शकतात. मात्र, आमच्यात जे काही विषय होते ते चर्चेने दूर झाले आहेत. मला संघटनेतून बाजूला केले असा काही विषय नाही. मी ११ दिवस परदेशात होतो. दीपक पटवर्धन व माझे चांगले संबंध आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्याचे नाव घोषित करताना मलाही फोन आला व मी लगेच अनुमोदन दिले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी