रत्नागिरी : शाळेत जातो असे सांगून घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी कोहिमा नागालँड येथून सुरक्षित परत आणले. या मुलांना सुरक्षिततेसाठी बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा प्रकार १८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला हाेता.याबाबत मुलींच्या नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केल्यावर तांत्रिक माहितीच्या आधारे तीन अल्पवयीन मुले नागालँडची राजधानी कोहिमा येथे गेल्याचे समजले. मुलांचे स्थळ निश्चित झाल्यावर नॉर्थ पोलीस ठाणे कोहिमाशी संपर्क साधून मुलांना ताब्यात घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तेथील पोलिसांनी रत्नागिरीतून हरवलेल्या तीन मुलांना ताब्यात घेतले.ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार विजय आंबेकर, पोलीस नाईक योगेश नार्वेकर, शहर पोलीस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रसाद घोसाळे, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक अमोल भोसले, आशिष भालेकर, वैभव नार्वेकर, पंकज पडेलकर, विलास जाधव, वैभव शिवलकर, पोलीस शिपाई अमित पालवे, दिलिशा आंब्रे, मृणाल लिंगायत, रमीज शेख यांनी केली.
शाळेत जातो असे सांगून रत्नागिरीतून तीन मुले गेलीत नागालँडला, तिघेही..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 5:51 PM