परशुराम घाटात गाडी अडवून तिघांना मारहाण, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 11:39 AM2024-12-09T11:39:34+5:302024-12-09T11:39:59+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात खेडकडे जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील तिघांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात खेडकडे जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील तिघांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह १० जणांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह, फैजल मेमन, मोईन पेचकर, महमद खान, फहद खान, निहाल अलवारे, हनिफ रुमाने, मुजफर इनामदार, शडियाज दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद मुनावर अहमद बोट (वय ४२, रा. मेटे माेहल्ला असगणी, खेड) यांनी दिली आहे.
मारहाणीत बोट यांच्यासह उस्मान इसप्न झगडे, महमद अली (दोघे, रा. असगणी) हे जखमी झाले आहेत. ५ डिसेंबर रोजी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जर्मिला शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने त्याची माहिती जसिता यांनी त्याचा भाऊ साजिद याला दिली. या पार्श्वभूमीवर चिपळूणहून साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह हे तिथे गेले असता त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला. त्यानुसार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुनाबर बोट यांच्यासह उस्मान नई व महमद जाली हे ६ रोजी चिपळूण येथे आले होते. मात्र, वाद न मिटल्याने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी साजिदसह दहाजण मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात थांबले हाेते. त्यांनी कार थांबवून मुनावर बोट, उस्मान झगडे, महमद अली यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये तिघांना दुखापत झाली. त्याचबरोबरच कारच्या दोन्ही बाजूच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी पाेलिसांनी निहाल, शाहबाज, मुजफर या तिघांना अटक केले आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव करीत आहेत.