शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रेल्वेच्या मोफत ‘वाय-फाय’चे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 11:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. लवकरच गणेशोत्सवाची गर्दी सुरू होणार असताना रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावंतवाडीसह अनेक स्थानकांवरील वायफाय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. लवकरच गणेशोत्सवाची गर्दी सुरू होणार असताना रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावंतवाडीसह अनेक स्थानकांवरील वायफाय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर २८ स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याच्या उपक्रमास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. प्रवाशांना, पर्यटकांना या सेवेचा लाभ मिळावा म्हणून रेल्वे मंत्रालयाने कोलाडपासून ते मडुरेपर्यंत २८ रेल्वे स्थानकांवर सिस्कॉन व जॉयस्टर या कंपन्यांकडून ‘जॉयस्पॉट’ ही वायफाय सेवा घेतली आहे. या सेवेचे रिसिव्हर बसविल्यानंतर सर्व २८ रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा उपक्रमाचे प्रातिनिधिक उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१ मे २0१७ रोजी कुडाळ स्थानकावर केले होते.कोकण रेल्वे मार्गावर कोलाड, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड, अंजनी, चिपळुण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड व मडुरे या स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपक्रमाची सुरुवात २१ मेपासून करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेला चांगले दिवस आले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा ही त्यातीलच एक महत्वाची सुविधा मानली जात आहे. मात्र काही महत्वाच्या स्थानकांवर ही सेवा महिनाभरापासून तर काही ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.काही स्थानकांवर चांगली सेवाचिपळुण, खेड, कणकवली, कुडाळ या रेल्वे स्थानकांवरील जॉयस्पॉट वायफाय सेवा मात्र चांगल्या प्रकारे सुरू असल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात आले. अन्य स्थानकांवरही ही सेवा चांगल्या प्रकारे मिळावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अशी चांगली सेवा मिळाल्यास रेल्वेतून प्रवास करताना कोणत्याही स्थानकावरून नातेवाईकांशी संपर्क साधणे प्रवाशांना शक्य होणार आहे. सध्या मार्गावरील अनेक ठिकाणी कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही, अशी स्थिती आहे.