शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:37 AM

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

ठळक मुद्देकंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराणपाणी व विजेचा तुटवडा, कुटुंबियांपुढे प्रश्न

संदीप बांद्रे चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.अवघ्या चिपळूणवासियांचे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिवरे येथे जुलै महिन्यात घडली. या घटनेत एकूण २२ जणांचा बळी गेला. या धक्क्यातून हळूहळू तिवरेवासीय सावरत असताना त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम आहे. एकूण ४५ कुटुंबियांचे पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तूर्तास येथील १० कुटुंबियांचे पुनर्वसन तिवरे येथेच कंटेनरमध्ये केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व शासनाकडून प्रत्येकी पाच असे एकूण १० कंटेनर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये एका कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.उघड्या माळरानावर तापताहेत कंटेनरसुरुवातीला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जागेत कंटेनर ठेवण्यात येणार होते; मात्र तेथे डोंगराला भेगा गेल्याने गावातीलच उघड्या माळरानावर हे दहाही कंटेनर ठेवण्यात आले आहेत. आॅक्टोबर हिटमुळे तापमान वाढले असल्याने त्याची झळ कंटेनरमधील कुटुंबियांना बसू लागली आहे.

दिवसभरात कंटेनर तापत असल्याने आतमध्ये अंगाची लाहीलाही होते. पंखा लावूनही काहीच उपयोग होत नाही. त्यातच कंटेनरबाहेर पडावे तर उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे. स्वच्छतागृहाचे सांडपाणी व मलमूत्रही उघड्यावर सोडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.एकाच मीटरवर सर्वांना वीज पुरवठायेथील दहाही कंटेनरना एकाच मीटरवरुन वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरगुती जोडणी पद्धतीने हा वीजपुरवठा केला असल्याने अनेकदा हा पुरवठा अपुरा ठरतो. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.झरे आटण्याच्या मार्गावरधरण फुटीमुळे तिवरेतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील पाणीयोजना पूर्णत: ठप्प झाली असून, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुरवलेल्या पाण्याच्या टाक्याही आता पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुनर्वसित कुटुंबियांसाठी झऱ्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत शिल्लक आहे; मात्र तोही आता हळूहळू आटू लागल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.दोन महिन्यात कोणी फिरकलेच नाहीतगणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३० आॅगस्ट रोजी घाईघाईत १० कुटुंबियांची कंटेनरमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून बळीराम चव्हाण, तुकाराम कनावजे, तानाजी चव्हाण, नारायण गायकवाड, कृष्णा कातुरडे, सखाराम तांबट, भगवान धाडवे, राधिका चव्हाण, लक्ष्मी चव्हाण व माधव धाडवे यांचे कुटुंबीय या कंटेनरमध्ये राहात आहेत. त्यानंतर आजतागायत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे; त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

कंटेनरमधील पर्यायी व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती; मात्र आता दोन महिने होऊनही येथेच राहावे लागत आहे. कंटेनरमधील रहिवास गरम्यामुळे नकोसा झाला असून, शासनाने याची वेळीच दखल घ्यावी.- नारायण गायकवाड, ज्येष्ठ ग्रामस्थ, तिवरे

घाईघाईत बसवण्यात आलेल्या कंटेनरची रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. शिवाय कंटेनरची लेव्हल योग्य पद्धतीची नसल्याने आतमध्ये असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तेथेच साचून राहाते.- बळीराम चव्हाण, तिवरे

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी