महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत देण्यासाठी २२ कोटी ४५ लाख रुपयांची गरज आहे. या अनुदानाची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. बाधित झालेल्या ५ हजार ४०१ व्यापारी, टपरी मालकांना ही मदत मिळणार असून, त्याची बिलेही प्रशासनाने तयार केली आहेत. व्यापाऱ्यांना ५० हजार, तर टपरी मालकांना प्रत्येकी १० हजार रुपये इतकी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार येथील ४ हजार ४७० व्यापारी व ९३१ टपरी मालकांना ही मदत मिळणार आहे.
व्यापाऱ्यांना अनुदान येण्याची प्रतीक्षा
गणेश उत्सवाच्या पाचवड येथील बाजारपेठ काही अंशी खुली असली तरी बहुतांशी व्यापाऱ्यांनी उधारीने माल आणला आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात अतिवृष्टी झाल्याने पुन्हा येथील व्यापारी वर्ग अडचणीत आला. पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी प्रशासनाला निवेदने देऊन पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, अजूनही व्यापारी वर्ग अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.