शिवाजी गोरेरत्नागिरी : जिल्ह्यातील मुरुड समुद्रात पर्यटकांना डॉल्फिनचे दर्शन झाले. समुद्र सफर करत असताना डॉल्फिन दर्शन झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. डॉल्फिन पाहण्यासाठी लोक खास करून दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर या समुद्रकिनाऱ्याला खास पसंती देत आहेत.दापोलीतील स्वछ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. या समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. त्यात समुद्रातील डॉल्फिन सफरची भर पडली असून, आंजर्ले पासून तर कोळथरे समुद्रात वारंवार डॉल्फिनचे दर्शन होत आहे. त्यामुळे या किनाऱ्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंदी देत आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड, कर्डे, लाडघर, कोळथरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, केळशी समुद्र किनाऱ्यावरून डॉल्फिन सफरसाठी खास बोटीची व्यवस्था असते. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. कोकणातील सर्वच समुद्रात डॉल्फिनचे दर्शन होत नाही.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे ते केळशी 50 किलो मीटरच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शन होत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील स्पोर्ट ऍक्टिव्हिटी व समुद्रातील डॉल्फिन सफर पर्यटकांची खास आकर्षण बनले आहेत.
मुरुड समुद्रात 'डॉल्फिन'चे दर्शन, डॉल्फिन दर्शनामुळे पर्यटक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 2:11 PM