साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा बाजारपेठेत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
या काळात अन्य वाहतुकीबराेबरच रिक्षा वाहतूकही पूर्णपणे बंद होती. कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, पोलीस कर्मचारी वैभव नटे, पोलीसपाटील मारुती शिंदे यांनी बाजारपेठेची पाहणी केली़.
शासनाच्या नियमांचे पालन करत सर्वच व्यवसाय बंद होते. त्यामुळे श्रीधर कबनूरकर, सरपंच बापू शेट्ये, पोलीसपाटील मारुती शिंदे व पोलीस यंत्रणेने समाधान व्यक्त केले. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता काेणीही घराबाहेर न पडता, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
लाॅकडाऊनच्या अमलबजावणीसाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेत पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता़ (छाया : संताेष पाेटफाेडे)