लांजा : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली़ यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती़मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले आहे. लांजा शहरामध्ये ओव्हर ब्रिजसाठी प्लेअर उभारण्यासा ड्रिल मारण्याचे काम पावसाळ्यात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही ड्रील मशीन घेऊन ट्रेलर मुंबईच्या दिशेने सकाळी ८ वाजता निघाला होता.
वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर उतार उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे साईटपट्टीवर ट्रेलरचे पुढील चाक मातीत रुतले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आधी देखील जम्बो ट्रेलर या वळणामध्ये अचानक बिघडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.शनिवारी सकाळी वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने छोटी वाहने एका बाजूने जात होती. ट्रेलरला थोडासे बाजूला केल्यानंतर दोन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.