रत्नागिरी - महाडजवळील वडपाले गावाजवळ एका एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ही दुर्घटना घडल्याने अनेक समस्यांवर मात करत मोठ्या संख्येने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे. खड्डे, महामार्गावर सुरू असलेले काम आणि पाऊस यामुळे आधीच ही वाहतूक मंदावली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत. महाडजवळील वडपाले गावाजवळ चिपळूणला जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. अशात ही दुर्घटना घडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या. कोकण रेल्वेचे वेळापत्रकही सध्या विस्कळीत झाले आहे. सर्व गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीतकोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये 60 प्रवासी असून ते थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भीषण आगीत एसटी जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे गणेशोत्सवासाठी जादा एसटी सोडण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ वडपाले येथे रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटीला भीषण आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. त्यामुळे एसटीतील 60 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या एसटीमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून गेले आहे. महाडजवळील वडपाले गावाजवळ कोकणातजाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ही काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर 2 ते 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.