अडरे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व चिपळूण बांबू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येतील लक्ष्मीबाई माटे सभागृहात सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग विषयावर कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात भारतातील तज्ज्ञ डॉ. हेमंत बेडेकर मार्गदर्शन करणार आहेत. बांबू लागवड कशी करायची त्यासाठी लागणारी जमीन, हवामान, पाणी, रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शन चिपळूण तालुक्यातील वेहेळे येथील आहेत. या शिबिराचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.