दापोली : जिल्ह्यातील मोठे मासळी खरेदी विक्री केंद्र असलेल्या हर्णै बंदरातील मासळी लिलाव प्रक्रिया आता रोखीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता येथील मासळीचा भाव किलोच्या हिशोबाने होणार असल्याने येथील मच्छिमारांसह मच्छीमार संस्थांचेही अर्थकारण बदलणार आहे. तसेच लिलावाची वेळ बदलण्यात आली असून, सकाळी साडेआठऐवजी ८ वाजता मासळी लिलाव सुरू होणार आहे, तर सायंकाळी साडेचारऐवजी ४ वाजता लिलाव सुरू होणार आहे.हर्णै बंदर ताज्या मासळीसाठी आणि खुल्या लिलाव पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोणीही येऊन लिलावात मासळी खरेदी करू शकतो. येथे सकाळी आणि संध्याकाळ मच्छी लिलाव चालतो. हर्णै बंदरात सध्या स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणात ही मासळी खरेदी करून पुणे, मुंबई, गोवा, मंगळुरू, कोचीन आदी ठिकाणी पाठवितात. मात्र, या व्यवहारात उधारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत होते. साहजिकच या व्यवहारांचा परिणाम मच्छिमारांच्या अर्थकारणावर होत होता.मासळीचे पैसे रोख मिळत नसल्यामुळे या मच्छिमारांना डिझेल, बर्फ, रेशनही उधारीवर खरेदी करावे लागत होते. मच्छिमारांना मच्छीमार संस्थांमार्फत डिझेल पुरवठा केला जातो. आपल्या सभासद मच्छिमारांची अडचण समजून या संस्थांनी उधारीवर डिझेल पुरवठा केला आहे. मात्र, आता डिझेलच्या किमती खूपच वाढल्या असून, प्रत्येक वेळी कंपनीकडून डिझेल खरेदीसाठी एवढी मोठी रक्कम कशी उभारायची, असा पेच निर्माण होत होता. ही उधारीची रक्कम संस्थांच्या प्रगतीस मारक ठरत असल्याची चर्चा गेली ५ वर्षे चालू होती. त्यामुळेच अखेर या संस्थांनी उधारी बंद केली. परिणामी येथील मच्छिमारांची कोंडी झाली होती.हर्णै बंदर समितीही या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत होती. अखेर आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छिमाराला जगवायचे असेल तर लिलाव रोखीत होणे गरजेचे आहे. यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार आता हर्णै बंदरातील व्यवहार रोखीत करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येथील मोठ्या प्रमाणातील मासळीचा लिलाव किलोच्या दराने होणार असून, लिलावात मिळालेल्या दरानुसार काट्यावर वजन करून पेमेंट केले जाणार आहे.या पद्धतीमध्ये मोठ्या रकमेसाठी ६० टक्के रक्कम रोख व उरलेली रक्कम ८ दिवसात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची सुरुवात हर्णै बंदरात त्वरित झाली असून, याबाबत मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, त्याचबरोबर ही पध्दत कायम स्वरूपी टिकणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले आहे. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही.मासळी लिलावाची वेळ बदललीहर्णै बंदरात सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा मच्छी लिलाव होतो. पूर्वी या लिलावाची वेळ सकाळी साडेआठ व सायंकाळी साडेचारची होती. त्यामध्ये आता बदल करून सकाळी ८ वाजता व सायंकाळी ४ वाजता लिलाव सुरू होतील.
हर्णै बंदरातील व्यवहार पुन्हा रोखीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 1:50 PM
Fisherman, Harnie, Dapoli, Ratnagirinews जिल्ह्यातील मोठे मासळी खरेदी विक्री केंद्र असलेल्या हर्णै बंदरातील मासळी लिलाव प्रक्रिया आता रोखीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता येथील मासळीचा भाव किलोच्या हिशोबाने होणार असल्याने येथील मच्छिमारांसह मच्छीमार संस्थांचेही अर्थकारण बदलणार आहे.
ठळक मुद्देहर्णै बंदरातील व्यवहार पुन्हा रोखीत होणारमच्छिमारांचे अर्थकारण बदलण्याची अपेक्षा