टेंभ्ये : कोविड महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मानवाला ऑक्सिजनची किंमत समजली आहे. पण वृक्ष आपल्याला वर्षानुवर्षे शुद्ध ऑक्सिजन देत आहेत, याचे महत्त्व आपण समजून घेणे आवश्यक आहे. मानवाचे जीवन वृक्षांवर अवलंबून आहे म्हणून वृक्ष हेच माणसाचे खरे सोबती आहेत, असे मत रत्नागिरीचे जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरामध्ये पाेलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, संजय कांबळे, संजय पाटील, प्रशिक्षणार्थी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे, निखिल पुजारी, सत्यवंत पाटील, मोहसीन औटी, कार्यालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपिक प्रशांत भोसले, दिनेश नाचणकर उपस्थित होते.
यावेळी मोहितकुमार गर्ग यांनी ई - चलन मशीनवर लायसन्स बारकोड रिड कशा पद्धतीनं होतो व गुन्हा कसा नोंद होतो, या संदर्भामधील माहिती घेतली. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
--------------------------
रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात जिल्हा पाेलीस अधीक्षक माेहीतकुमार गर्ग, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.