अरुण आडिवरेकररत्नागिरी : गेली बारा वर्षे रखडलेले मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम आता थट्टेचा विषय बनला आहे. पावसामुळे महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्गावरील हे खड्डे आता साेशल मीडियावर जाेरदार ‘ट्राेल’ हाेत आहेत. ‘एक आडवा न तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं’ असे म्हणत कामाची खिल्ली उडवली जात आहे.मुंबई-गाेवा महामार्गाच्या कामानंतर सुरू केलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण हाेऊन प्रवासही सुरू झाला. पण, मुंबई-गाेवा महामार्ग रखडलेलाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काम अद्याप रखडलेले आहे. पावसामुळे या महामार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे ‘एक आडवा न तिडवा खड्डा’ म्हणत साेशल मीडियावर ‘ट्राेल’ हाेऊ लागले आहेत. अनेकांनी हे गाणे स्टेटसवरही ठेवले आहे. सिंधुदुर्गातील भजन मंडळाने भजनाच्या माध्यमातून रखडलेल्या कामाबाबत गाऱ्हाणे मांडले आहे. तर, एका प्रवाशाने खड्ड्यामुळे टायर फुटत असल्याचा व्हिडीओच व्हायरल केला आहे.
नितीन गडकरींची नाराजीरखडलेल्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या अधिवेशनात नाराजी व्यक्त केली. त्यांनी महामार्गाच्या कामावर पुस्तकच छापता येईल, असे वक्तव्य करून दिलगिरीही व्यक्त केली.
गणपतीपूर्वी एक लेन हाेईलसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाेन दिवसापूर्वी महामार्गाची पाहणी करून पावसाने साथ दिली तर गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण हाेईल असे सांगितले. तसेच, डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्ग पूर्ण हाेईल, असे आश्वासन दिले आहे.
टायर फुटलाकाेलाडपासून काही अंतरावर महामार्गावर सुमारे एक फुटाचा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात गाडी आपटून टायर फुटत असल्याचा व्हिडीओही एका प्रवाशाने व्हायरल केला आहे.
एक आडवा न तिडवा खड्डाचंद्रावानी पडलाय गं,मेला कंत्राटदार हसताेय कसाकी काेकणकर पडला गं,या आकांताचा तुला इशारा कळला गंखड्डा आडवा येताे मलाकी पाय माझा माेडला गं,नकाे राणी नकाे रडूखड्ड्यामध्ये नकाे पडूइथून नकाे तिथून जाऊरस्ता गावताेय का पाहू(हे गाणे साेशल मीडियावर फिरत आहे.)